MI vs CSK : चेन्नई सुपर किंग्‍जची मुंबई इंडियन्सवर २० धावांनी मात

MI vs CSK : बॅट तुटल्याने रैना आऊट
MI vs CSK : बॅट तुटल्याने रैना आऊट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क ; MI vs CSK : कोरोनामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती. आजपासून पुन्हा २०२१ चा हंगाम सुरु करण्यात आला आहे. आज पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सुरु आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीने हा निर्णय याेग्‍य ठरला चेन्नई सुपर किंग्‍जने मुंबई इंडियन्सवर २० धावांनी मात केली.

ऋतुराज गायकवाडची दमदार खेळी

रविवारपासून आयपीएलचा दुसरा हंगाम सुरु झाला. पहिल्‍याच सामान्‍यात याच हंगामातील पूर्वाधात मुंबई इंडियन्‍सकडून झालेल्‍या पराभावाची फरतफेड करण्‍यासाठी चेन्‍नई सुपर किंग्‍जचा संघ दुबईच्‍या मैदानात उतरला.

चेन्‍नईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्‍या. यामध्‍ये ऋतुराज गायकवाडने नाबाद ८८ धावांची खेळी केली. यामध्‍ये त्‍याने ९ चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली.

आव्‍हानाचा पाठलाग करताना मुंबईचा डाव चेन्‍नईच्‍या भेदक गोलंदाजीमुळे कोलमडला. मुंबईने आठ गडी गमावत १३६ धावा केल्‍या. २० धावांनी मुंबई इंडियन्‍सवर चेन्‍नईने विजय साकारला. या पराभवामुळे मुंबई इंडियन्‍सचा संघा चौथ्‍या स्‍थानावरच राहिला आहे. तसेच संघाचा रन रेटही कमी झाला आहे.

गुणतालिकेत चेन्‍नई अव्‍वलस्‍थानी

चेन्‍नई संघाने यंदाचा हंगामात आठपैकी सहा सामने जिंकत १२ गुण मिळवत रनरेटच्‍या जोरावर अव्‍वल स्‍थानावर आहे. दुसर्‍या स्‍थानावर दिल्‍ली कॅपिटल्‍स दुसरा तर आरसीबीचा संघा तिसर्‍या स्‍थानावर आहे.

मुंबई इंडियन्‍सने आठपैकी चार सामनेच जिंकत चौथ्‍या स्‍थानावर आहे. राजस्‍थान रॉयल्‍स आणि पंजाब हे अनुक्रमे पाचव्‍या आणि सहाव्‍या स्‍थानी आहेत.तर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हे अनुक्रमे सातव्‍या आणि आठव्‍या स्‍थानी आहेत.

हेही वाचलं का :

स्त्रीच्या कर्तुत्वाला सन्मान देणारी अमृता फडणवीसांची गणेश वंदना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news