नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : २०२२ मध्ये मृत्यू प्रमाणात झालेल्या वाढीमागे केवळ कोरोना कारणीभूत नव्हता, असे प्रतिपादन नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केले. कोरोना मृत्यूचे सरकारकडून जे आकडे सांगितले जात आहेत. त्यापेक्षा कितीतरी जास्त मृत्यू या विषाणूने घेतले असल्याचा दावा काही संस्था करीत आहेत. सदर संस्थांनी हे दावे थांबवावेत, असे आवाहनही पॉल यांनी या वेळी केले.
जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत कोरोनामुळे झालेले मृत्यू हे सरकारी आकड्यांपेक्षा आठपटीने जास्त असल्याचे लॅन्सेट नावाच्या संस्थेने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्याचा दाखला पॉल यांनी दिला. वरील कालावधीत सरकारने कोरोना बळींचा आकडा ४ लाख ८९ हजार इतका दिला होता. तर लॅन्सेटने भारतातले कोरोना बळी जगात सर्वाधिक असल्याचा दावा केला होता.
हेही वाचलंत का?