धारूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूरकडून सिंमेट भरून परभणीकडे जाणारे ट्रक दोनशे मीटर खोल दरीत कोसळल्याची घटना ताजी असताना पुन्हा धारूर घाटात उस्मानाबादहून माजलगावकडे सिमेंट घेवून जाणारा ट्रक पलटी झाला. ही घटना धारुर घाटातील एका अवघड वळणावर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने सोमवारी (दि. १४) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान ट्रक चालकाला मृत्यू झाला. यानंतर आणखी किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार आहे? असा प्रश्न वाहन- चालकासह नागरिकांना पडला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, या अपघातातील चालकाचे नाव मुस्तफा उमपुरे असे आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापूरकडून सिंमेट भरून परभणीकडे जाणारे ट्रक (क्र. एमएच १२ एनएक्स ४०९०) अवघड वळणावर कठडा तोडून जवळपास दोनशे मीटर खोल दरीत कोसळला होता. या अपघातात चालक पैंगबर पटेल हा जागीच ठार झाल्याची घटना ताजी आहे. तर सोमवारी धारुर घाटात पुन्हा सिमेंट घेवून जाणारा ट्रक (क्र. एमएच २५ पी ९५४७) टलटी होवून अपघात घडला.
उस्मानाबादहून माजलगावकडे सिमेंट घेवून जाणाऱ्या ट्रक चालकाचे घाटातील वळणावर ताबा सुटून ट्रक उजव्या बाजूस पलटी झाला. अपघातात चालक मुस्तफा उमपुरे हा गंभीर जखमी झाला. यानंतर तेथील नागरिकांनी मुस्तफा याला अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले. परंतु. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सतत होत असलेल्या अपघातामुळे धारुर घाट मृत्यूचा सापळा बनला आहे. घाट रुंदीकरण लवकरात- लवकर करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ सीवरील धारूर माजलगाव रस्त्यावर अवघड घाट आहे. या घाटात अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. यामुळे या प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा असे देखील वाहन- चालकासह नागरिकांनी यावेळी म्हटले आहे.
हेही वाचलंत का?