फोटोग्राफरशी झालेल्या भांडणावरून पत्नीचा जबडा केला फ्रॅक्चर!

Crime
Crime
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

तीन वर्षापूर्वी लग्नात फोटोग्राफरशी झालेल्या वादातून पत्नीच्या तोंडावर बुक्की मारून तिचा जबडा फ्रॅक्चर करणार्‍या पतीला खडक पोलिसांनी अटक केली. कौस्तुभ दिपक खरबस (32, रा. सिटी अपार्टमेंट, गुरूवारपेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पत्नी आकांक्षा कौसतुभ खरबस (27, रा. गुरूवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिस उपनिरीक्षक यश सुर्यवंशी यांनी सांगितले, तीन वर्षापूर्वी कौस्तुभ आणि आकांक्षा याचा विवाह झाला होता. विवाहावेळी वर-वधुकडील दोन्ही बाजुंनी आपापले फोटोग्राफर बोलविले होते. फोटो काढत असताना दोन्ही फोटोग्राफरमध्ये वाद झाले होते. त्यावेळी आकांक्षा यांच्या भावाने वराकडील फोटोग्राफरला समजावले होेते. परंतु, सहा महिन्यांपूर्वीच दोन्ही फोटोग्राफर पुन्हा एका कार्यक्रमात भेटले आणि तेथेही त्यांची भांडणे झाली.

ही भांडणे पुन्हा कौस्तुभ याच्या कानावर आली. त्यानंतर लग्नातील त्या भांडणाचा राग कास्तुभने आकांक्षावर काढताना पाण्याने भरलेली बाटली तिला फेकून मारली, तसेच भिंतीचे प्लास्टर लेव्हल करण्याच्या बॉटम पट्टीने व हाताने मारहाण करून आकांक्षा यांच्या तोंडावर जोरात बुक्की मारली. या मारहाणीत त्यांची दाढ पडली आणि जबडाही फ्रॅक्चर झाला. या मारहाणीबद्दल आकांक्षा यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news