carrot : चांगल्या दृष्टीसाठी रोज किती गाजरे खावीत?

carrot
carrot
Published on
Updated on

न्यूयॉर्क : हार्वर्ड टी.एच. चान स्कूलनुसार इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनने 'अ' जीवनसत्त्वाच्या दैनिक खुराकाविषयी माहिती दिली आहे. एखाद्या 19 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या पुरुषाला आपली द़ृष्टी चांगली करण्यासाठी रोज 900 एमसीजी आरएई म्हणजेच 3 हजार आययू 'अ' जीवनसत्त्व घेतले पाहिजे. तसेच याच वयाच्या महिलांनी 'अ' जीवनसत्त्वाचा 700 एमसीजी आरएई किंवा 2,333 आययू खुराक रोज घेतला पाहिजे. 'यूएसडीए'च्या माहितीनुसार 100 ग्रॅम कच्च्या गाजरात 16700 आययू 'अ' जीवनसत्त्व असते. त्यामुळे रोज 50 ग्रॅम गाजर (carrot) खाऊनही आपण डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी पुरेसे 'अ' जीवनसत्त्व मिळवू शकतो.

गाजरामध्ये 'अ' जीवनसत्त्वाशिवाय अन्यही अनेक पोषक घटक असतात. गाजरात बीटा कॅरोटिन, अल्फा कॅरोटिन, ल्यूटिन आणि जियाक्सॅथिनही असते. वाढत्या वयाबरोबर द़ृष्टी कमजोर होण्यापासून ते बचाव करतात. याशिवाय हे घटक ताणतणाव तसेच हानिकारक किरणांपासूनही डोळ्यांच्या स्नायूंना वाचवतात. चिवट चरबी हटवण्यासाठीही गाजराचे सेवन लाभदायक ठरते. याचे कारण म्हणजे ते आपल्या कॅलरी इनटेकला कमी करते आणि पोट भरल्याची भावना दीर्घकाळ टिकून राहते. गाजरात (carrot) पाण्याचे प्रमाणही चांगले असल्याने ते फॅट जाळणार्‍या चयापचय क्रियेला गती देते.

गाजरांमुळे (carrot) केसांसाठी गरजेचे बायोटिन मिळते. रक्तदाब व हृदयाशी संबंधित समस्यांवरही गाजराचे सेवन लाभदायक ठरते. याचे कारण म्हणजे गाजरात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. अनेक संशोधनांमधून असे आढळले आहे की गाजराचे सेवन प्रोस्टेट, पोट तसेच आतड्याच्या कर्करोगापासूनही बचाव करण्यास उपयुक्त आहे. शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही गाजर उपयुक्त आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news