पुढारी ऑनलाईन : हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपले आहे. दरम्यान सिमल्यामध्ये भूसख्खलनामुळे मंदिर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या मंदिरात अनेकजण अडकल्याची भिती आहे. तसेच मंदिराच्या जवळपासच्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे. अधिकचा तपशील प्रतीक्षेत असल्याची माहिती शिमलाचे एसपी संजीव कुमार गांधी यांनी दिली आहे, असे वृत्त एनआयने दिले आहे.
शिमला येथील शिव देह मंदिर दुर्घटनेत किमान १० लोक अडकल्याची भिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे, असे हिमाचल प्रदेशातील एका गावात ढगफुटीमुळे सात जणांचा मृत्यू झाला, तर ६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. उत्तराखंडमध्येही संततधार पावसामुळे भूस्खलन झाले असून बियास नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राज्यांमधील अनेक भागातील शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती, अशी माहिती येथील प्रशासनाने दिली आहे.
हिमाचल प्रदेश आणि शेजारील उत्तराखंडमध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. ढगफुटी, भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग, मुख्य रस्ते, पूल वाहून गेले आहेत. शैक्षणिक संस्था बंद पडल्या आणि नद्यांच्या पाण्याची पातळीत देखील वाढ झाली असल्याची माहिती येथील प्रशासनाने दिली आहे.