विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सूर्याचा प्रकोप ! चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४३.४ डिग्री तापमानाची नोंद

उष्णतेची लाट www.pudhari.news
उष्णतेची लाट www.pudhari.news
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भात पुन्हा उन्हाची तीव्र लाट आली असून, नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये सूर्याचा प्रकोप दिसून येत आहे. सॊमवारी अकोल्याचा पारा ४२.९ अंशांवर गेला. तर मंगळवारी अकोल्यात ४३.१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. मंगळवारी चंद्रपूर येथे विदर्भात सर्वाधिक ४३.४ अंश एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली.

मंगळवारी विदर्भातील अकोल्यात ४३.१,वर्धा ४२.४, अमरावती ४१.९,ब्रम्हपुरी ४१.७, यवतमाळ ४१.५, वाशिम ४१.५, बुलडाणा ४०.२,गडचिरोली ३९.६ आणि नागपूर येथे ४१.५ अंश तापमानाची नोंद झाली.

सोमवारी अकोला हे जगात आठव्या क्रमांकाचे हॉट शहर ठरले होते. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी होताच लाटेने डोकं वर काढले आहे. गडचिरोलीचा अपवाद वगळता संपूर्ण विदर्भात सध्या उन्हाची तीव्र लाट पसरली आहे. उन्हाचा सर्वाधिक फटका अकोला, अमरावती आणि चंद्रपुरला बसतो आहे.

या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४३ अंशाला टेकले आहे. भारतात सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये मध्य प्रदेशातील खरगोन (४३ अंश सेल्सिअस ) नंतर अकोला दुसरे व जगातील एकूण आठवे हॉट शहर ठरले. सकाळी आठ-नऊ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसताहेत. उन्हामुळे एरवी दुपारच्या सुमारास असणारी रस्त्यांवरील वर्दळही कमी दिसून आली.

विदर्भात उन्हाची लाट आणखी दोन-तीन दिवस राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे म्हणणे आहे. विशेषतः अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा जबर तडाखा जाणवणार आहे.

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news