गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापुरात दाखल

गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापुरात दाखल
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करणारे वक्‍तव्य केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अटक केलेले अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीची मुदत आज सोमवारी संपली. त्यामुळे त्यांना कसबा बावडा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. येथे गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सदावर्ते यांच्या जामिनासाठी कोल्हापूर न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आता पुणे पोलीस कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

सदावर्ते यांना बुधवारी मुंबई येथील कारागृहातून शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. पी. गायकवाड यांनी त्यांना दि. २५ पर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला होता. सकल मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी सदावर्तेंविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली होती.

मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी अ‍ॅड. सदावर्ते यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली होती. ॲड. सदावर्ते यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवाय मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्या तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करण्याचा सदावर्तेंचा प्रयत्न सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करणारा आहे, असेही दिलीप पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news