Gujarat Floods : गुजरातमध्ये पुराचा हाहाकार, ६१ जणांचा मृत्यू

File Photo
File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईल डेस्‍क : गुजरातच्या वलसाड येथे मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पुरामुळे अनेक दुर्घटना घडल्या असून यात जवळपास ६१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अनेक लोक पुरात अडकल्याचेही समजते आहे. तसेच अहमदाबादमध्येही तब्‍बल चार तासांच्या मुसळधार पावसाने पूर परिस्‍थिती ओढवली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, येथे एनडीआरएफचे पथकाने बचावकार्य सुरू केले आहे.

गुजरातची आर्थिक राजधानीत अहमदाबाद अहमदाबाद येथे काल संध्याकाळी मूसधार पावसाने रेकॉर्डब्रेक केले आहे. तर अहमदाबादच्या सवर् रस्त्यांसह घराघरात पाणी पाणी झाले आहे. तर अनेक वाहने पाण्यात वाहून गेली आहेत.  शहरातून अजूनही पावसाचे पाणी ओसरलेले नाही. रस्ते अजूनही पाण्याखाली आहेत. संपूर्ण शहर जलमय झाले आहे. अनेक घरात पाणी शिरले आहे.

तर वलसाडमध्ये पूर आला असून, अनेक लोक अडकले आहेत. एनडीआरएफच्या टीमने बचावकार्य सुरू असून हेलिकॉप्टरच्या मदतीने पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. तर एका बसमध्ये अडकलेल्‍या ४८ जणांची एन डी आर एफ आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी सुटका केली.

ओरंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामूळे नदीचे पाणी जिल्ह्याच्या अनेक भागात शिरले आहे. तर तुलसी नदीलाही पूर आला आहे. तसेच नवसारीमध्येही पूरस्थिती निमार्ण झाली आहे. पूर्णा नदीला सुध्दा पूर आला असून काल ११०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news