Gmail Down : गुगलची जी-मेल सेवा विस्कळीत; युजर्सची उडाली तारांबळ

Gmail Down : गुगलची जी-मेल सेवा विस्कळीत; युजर्सची उडाली तारांबळ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Google ची ईमेल सेवा (Gmail) काही तासांपासून विस्कळीत झाली आहे. डाऊनडिटेक्टर या अॅप्स आणि वेबसाइट्सच्या ऑनलाइन स्टेटसचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १०) रात्री ७ वाजल्यापासून गुगलची जी मेल ही सेवा बंद (Gmail Down) आहे. अनेक युजर्स या बाबतची तक्रार नोंदवत आहेत.

डाउनडिटेक्टर वेबसाइटनेही या आउटेज संबंधित एक ट्विट केले आहे. "युजर्जनी दिलेल्या तक्रारींचा अहवाल पाहता जी मेलला ( Gmail) सकाळी 9:12 AM EST पासून समस्या या येत आहेत. त्याचबरोबर या ट्विटमध्ये जी मेल सेवेबाबत येत असणाऱ्या त्रुटींचा मजकूर देखील दिला आहे. http://downdetector.com/status/gmail/ RT if you're also having problems #Gmaildown," हा तो मजकूर आहे. गुगलचे युजर्स ट्विटरवर याबाबत तक्रार करत आहेत की त्यांच्या जी मेल बंद आहे.

गुगल सेवा म्हणते कोणताही अडथळा नाही

गुगलद्वारे असे सांगण्यात येत आहे की, GoogleWorkspace मध्ये जी मेल सेवा हिरव्या रंगात दाखवत याचा अर्थ जी मेल सेवेत कोणताही अडथळा येत नाही. "Google Workspace हे गुगलच्या सेवांबद्दलच्या स्थितीची माहिती देते. या गुगल वर्कस्पेसनुसार त्यांनी सूचीबद्ध केलेल्या सेवांची चालू स्थिती पाहता येते. सूचीबद्ध नसलेल्या सेवेला समस्या येत असतील तर त्यांच्या संपर्क टीमशी साधावा लागतो. मात्र युजर्स जीमेल बंद असल्याची तक्रार ट्विटरवर नोंदवत आहेत. या तक्रारी वाढत असल्याचे देखील होत आहे. जी मेलने मात्र या सर्व तक्रारीबाबत कोणतेही ट्विट केलेले नाही. जी मेलचे शेवटचे ट्विट हे १६ तासांपूर्वीचे आहे. युजर्सच्या तक्रारी वाढत असल्या तरीही जी मेलने याकडे दुर्लक्ष केलेले यातून दिसून येत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news