Gautami Patil : गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन; पुण्यामध्ये सुरु होते उपचार

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन; पुण्यामध्ये सुरु होते उपचार
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वडिलांचा पुण्यात दुर्दैवी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी धुळ्यात तिचे वडील बेवारस अवस्थेत सापडले होते. गौतमी पाटील ही तिच्या वडिलांपासून वेगळी रहात होती. पुण्यातील बिबवेवाडी भागातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. आई आणि वडील पूर्वीच वेगळे राहत होते. मात्र गौतमी तिच्या आईसोबत राहत होती. गेल्या काही दिवसांपासून तिचे वडील रवींद्र पाटील यांची प्रकृती खालावली होती.

धुळ्याजवळील सूरत महामार्गावर दुर्गेश चव्हाण यांना ते बेवारस अवस्थेत आढळले होते. सुरुवातीला त्यांची ओळख पटली नव्हती. त्यांना धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्याजवळ एक आधारकार्ड सापडल्यामुळे त्यांचं नाव चव्हाण यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियात त्यांच्याबद्दल माहिती टाकल्याने गौतमी पाटील यांचे ते वडील असल्याचं समजलं. त्यानंतर गौतमीला यासंदर्भात माहिती मिळताच तिने त्यांना पुण्यातील बिबवेवाडी भागातील चिंतामणी रुग्णालयात दाखल केले. अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news