Gangakhed News : वीर जवान लक्ष्मण तांदळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Veer Javan Laxman Tandale
Veer Javan Laxman Tandale
Published on
Updated on

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : Gangakhed News : भारतीय लष्करी सेवेत तांत्रिक विभागात गत १४ वर्षांपासून कर्तव्यावर असलेले वीरजवान लक्ष्मण रामराव तांदळे यांच्या अपघाती निधनाने गंगाखेड तालुका हळहळला. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी (दि.२६) दुपारी ३ वाजता साश्रू नयनांनी तालुक्यातील तांदुळवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी भारत माता की जय, वंदे मातरम, जवान लक्ष्मण तांदळे अमर रहेच्या घोषणांनी तांदूळवाडी परिसर अक्षरशः गहिवरला. (Gangakhed News)

अलोर (राजस्थान) येथे लष्करात तांत्रिक विभागात सेवेत असलेले जवान लक्ष्मण रामराव तांदळे (वय ३४ वर्षे) यांना अपघाती वीरमरण आले. वीरजवान लक्ष्मण तांदळे यांचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावरून सुभेदार रवींद्र पवार (औरंगाबाद) व हवालदार प्रशांत यांच्या पथकाकडून गंगाखेड शहरात दुपारी १ वाजता आणण्यात आले. शहराच्या महाराणा प्रताप चौक ते तहसील कार्यालयापर्यंत माजी सैनिक संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने वीर जवान तांदळे यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

वीरजवान लक्ष्मण तांदळे यांच्या पार्थिवावर आज बुधवारी (दि.२६) दुपारी ३ वाजता तालुक्यातील तांदुळवाडी येथे शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनातील अधिकारी तसेच माजी सैनिकांच्या वतीने माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ सातपुते, उपाध्यक्ष प्रल्हाद मुंडे, तालुकाध्यक्ष अशोक आईनिले यांनी मानवंदना दिली. वीरजवान लक्ष्मण तांदळे यांचे मोठे भाऊ डॉ.केशव यांनी त्यांना मुखाग्नी दिला. Gangakhed News

वीरजवान लक्ष्मण तांदळे यांच्या अंत्यविधीस परभणीचे खासदार संजय जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, माजी आमदार मोहन फड, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, भाजपचे रामप्रभू मुंडे, मनसेचे बालाजी मुंडे, राष्ट्रवादीचे युवा नेते मिथीलेश केंद्रे, एसडीएम जीवराज डापकर, तहसीलदार प्रदीप शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, पिंपळदरीचे सपोनि विक्रम हराळे आदींसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news