इवल्‍याशा माशाचा मृत्‍यूलाही चकवा; पक्षाच्या चोचीतून ‘अशी’ केली स्‍वत:ची सुटका (व्हिडिओ)

इवल्‍याशा माशाचा मृत्‍यूलाही चकवा
इवल्‍याशा माशाचा मृत्‍यूलाही चकवा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन ; या जगात कोणालाही संघर्ष चुकलेला नाही. आपल्‍या निसर्गात अनेक जीव आहेत, ज्‍यांना जगण्यासाठी रोज मोठा संघर्ष करावा लागतो. यात त्‍यांच्या जीवन मरणाची वेळोवेळी गाठ पडत असते. मात्र अशा परिस्‍थितही त्‍यांची जगण्याची उमेद मात्र कायम असते. असते.

असाच एक स्‍वत:चा जीव वाचवणारा छोटासा मासा आणि पोट भरण्यासाठी धडपडणारा पक्षी या दोघांचा संघर्षाचा एक अद्भत व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहताना शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा हा व्हिडिओ आपल्‍या काळजाचा ठोका नक्‍कीच चुकवतो असं म्‍हणावं लागेल. या व्हिडिओला कॅप्शन आहे, दुसरी संधी नेहमी मिळते…

ज्‍याचं रक्षण परमेश्वर करतो, त्‍याला कोणीही मारू शकत नाही या उक्‍तीचा प्रत्‍यय आपल्‍याला नेहमीच आपल्‍या आजुबाजूला घडणाऱ्या घटनांतून येत असतो. सोशल मीडियावर एक मासा आणि पक्षाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्‍यामध्ये एक मासा स्‍वत:ला मरणाच्या दाढेतून बाहेर काढतो. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मासा जेंव्हा आपल्‍या मृत्‍यूला चकवा देताना पाहाला तेंव्हा तुम्‍हीही हैरान व्हाल. या व्हिडिओत हा इवलासा मासा सारस सारख्या मोठ्या पक्षाशी झुंजतो आणि आपला लाखमोलाचा जीव वाचवतो. या व्हिडिओला दुसरी संधी नेहमी मिळते असे अर्थपूर्ण कॅप्शन देण्यात आले आहे.

या व्हिडिओत एक दलदल दिसून येते. ज्‍यात एक सारससारखा मोठ्या मानेचा पक्षी एका माशाची शिकार करताना दिसून येत आहे. पहिला तर पक्षी आपल्‍या चोचीत माशाला पकडतो, यानंतर तो त्‍या माशाला उडवून तोंडात आत टाकण्याचा प्रयत्‍न करतो. मात्र त्‍यावेळीच मासा झटपटू लागतो, अन् मोठ्या चतुराईने मासा पक्षाच्या चोचीतून बाहेर येवून पाण्यात पडतो. या पक्षाचा जगण्याचा संघर्ष पाहून जाणवते की हा मासा आपल्‍या जीवासाठी काहीही करू शकतो.

या व्हिडिओवर कमेंट करताना एक युजर म्‍हणतो, मला वाटत होते की, तो मासा पक्षाचा घशात जावा तर दुसरा म्‍हणतो या माशाकडे चांगलीच कला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news