मुंबई : कुर्ल्यात इमारतीला भीषण आग

मुंबई : कुर्ल्यात इमारतीला भीषण आग
Published on
Updated on

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : कुर्ला येथील एका इमारतीला आग लागल्याची आज दुपारी घडली. घटनास्थ‍ी पोलिस दल आणि अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

न्यू टिळक नगर भागात ही इमारत आहे. या इमारतीत अनेक रहिवासी कुटुंबे राहायला आहेत. या इमारतीतील वरच्या मजल्यांना आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी लोक इमारतीच्या खिडकीचा आधार घेत बाहेरील बाजूस येऊन उभे राहिले. दरम्यान, पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.

इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशामुळे लागली, याबाबत माहिती मिळालेली नाही. ही १२ मजली इमारत असून वरच्या मजल्यावरील एका रुममध्ये ही आग लागल्याची माहिती समोर आलीय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news