ENGvsIND 3rd test : स्कोर विचारून चिडवणाऱ्या इंग्लिश फॅन्सची सिराजने केली बोलती बंद

ENGvsIND 3rd test : स्कोर विचारून चिडवणाऱ्या इंग्लिश फॅन्सची सिराजने केली बोलती बंद
Published on
Updated on

लीड्स; पुढारी ऑनलाईन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा (ENGvsIND 3rd test) पहिला दिवस भारतासाठी चांगला गेला नाही. इंग्लडने भारताचा पहिला डाव ७८ धावांत गुंडाळला. त्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीर फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. इंग्लंडचे सलामीवीर रोरी बर्न्स आणि हसीब हमीद या सलामी जोडीने दमदार फलंदाजी करत नाबाद शतकी भागीदारी रचली. या दोघांनी दिवस अखेर इंग्लंडला १२० धावांपर्यंत पोहोचवले आणि ४२ धावांची आघाडी मिळवून दिली. (ENGvsIND 3rd test)

दरम्यान, दिवसाचा खेळ संपत असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला काही इंग्लिश प्रेक्षकांनी चिडवण्याचा प्रयत्न केला. पण सिराज याने त्याचे वाईट वाटून न घेता आपल्या स्टाइलमध्ये उत्तर दिले.

सिराजला इंग्लंडच्या प्रेक्षकाने स्कोर विचारला. यावर सिराजने इशारा करत १-० असे स्कोर सांगितला. सिराजच्या सांगण्यानुसार स्कोर भारताच्या बाजूने १-० असा आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सिराजची या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी राहिली आहे. लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटी मालिकेत भारताला विजय मिळवून देण्यात सिराजने महत्वाची भूमिका बजावली होती.

भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यात भारतीय टीमकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र, लॉर्ड्सवरील जिव्हारी लागलेल्या पराभवाचे उट्टे इंग्लंड संघ लीड्स कसोटीत काढण्याचा प्रयत्न करत आहे.

पहिल्या दिवशी भारताचा संपूर्ण संघ ४०.४ षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताकडून रोहित शर्माने १०५ चेंडूत १९ धावा केल्या.

इंग्लंडकडून अनुभवी जेम्स अँडरसनने भारताची वरची फळी संपवली. त्याने अवघ्या. ६ धावांत ३ विकेट घेतल्या. त्यानंतर क्रेग ओव्हरटर्नने भारताची शेपूट झटपट गुंडाळली. त्यानेही १४ धावा देत ३ बळी टिपले.

इंग्लंडच्या सलामी फलदाजांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बिनबाद १२० धावा केल्या.

चहापानानंतर इंग्लंडचे सलामीवीर रोरी बर्न्स आणि हसीब हमीद यांनी चांगली सुरुवात केली. हमीदने आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडची धावसंख्या झपाट्याने वाढवण्यास सुरुवात केली.

हमीद पाठोपाठ सेट झाल्यावर बर्न्सनेही आपला धावांचा वेग वाढवला.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news