पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री क्रिसन परेरा भारतात परतली आहे. मुंबई विमानतळावर येताच ती भावाला पाहून ढसाढसा रडू लागली. 'सडक २' आणि 'बाटला हाऊस' यासारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले होते. २७ वर्षांची क्रिसन (Chrisann Pereira) १ एप्रिल रोजी मुंबईहून शारजाह जात होती. एका ऑडिशनसाठी तिला शारजाह जायचे होते. पण, शारजाह पोहोचल्यानंतर तिला अटक करण्यात आली. क्रिसन जवळ ड्रग्जने भरलेली शील्ड सापडली होती. तिला अटक करण्यात आली होती. (Chrisann Pereira)
पण, नंतर माहिती समोर आली की, ट्रॅपमध्ये फसवून तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. आता ड्रग्ज प्रकरणात तिला जामीन मिळाल्यानंतर ती भारतात परतली आहे. विमानतळावर आपल्या कुटुंबियांना पाहून ती ढसाढसा रडू लागली.
तिचा भाऊ केविन परेराने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, क्रिसन आपला भाऊ केविनला दूरवरून पाहताच रडणे सुरु करते. ती इतकी भावूक होते की, केविनला बिलगून ती रडू लागते. ती आपल्या आईला देखील भेटते.
हा भावूक व्हिडिओ शेअर करत केविनने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'अखेर क्रिसन परत आली. आम्ही सर्वजण पुन्हा भेटलो. मला माहित होतं, मी म्हटलं होतं की, ती जून महिन्यात परत येईल. थोडा अधिक वेळ लागला. आता ती परत आली आहे'
ड्रग्स प्रकरणात क्रिसनला अडकवणारे आरोपी अँथनी पॉल आणि त्याचा सहकारी राजेश बाभोटे उर्फ रविला अटक करण्यात आली आहे.