Dhule News : किरकोळ कारणावरून एकाला जिवंत जाळणाऱ्या तरुणाला जन्मठेप

Dhule News : किरकोळ कारणावरून एकाला जिवंत जाळणाऱ्या तरुणाला जन्मठेप
Published on
Updated on

धुळे: पुढारी वृत्तसेवा- लहान मुलांच्या खेळण्याच्या किरकोळ कारणावरून एकाच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळल्या प्रकरणात दोंडाईचा येथील तरुणाला धुळ्याच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. जे. बेग यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी अभियंता गणेश पाटील यांनी मयत युवकाचा मृत्यूपूर्व जवाब आणि रासायनिक विश्लेषणाच्या अहवालासह विविध न्यायालयाचे निवाडे न्यायालयात सादर केले.

दोंडाईच्या येथे राहणारे आरिफ शेख नईम हे 12 डिसेंबर 2016 रोजी पान खाण्यासाठी जात असताना याच शहरातील अब्दुल रमजान मणियार यांनी लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून आरिफ शेख नईम यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवून दिले. यात आरिफ हे 61 टक्के भाजले. त्यांना धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र पंधरा डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या संदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्यात अब्दुल रमजान मणियार, रऊफ शेख मन्यार, रेहाना मण्यार व सुलताना बी शेख रमजान मण्यार यांच्या विरोधात भादवी कलम 307, 302 अन्वये तक्रार देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे यांनी केला. या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश बेग यांच्यासमोर झाले. या खटल्यात सरकारी अभियोक्ता गणेश पाटील यांनी सरकार पक्षाच्या वतीने 10 साक्षीदारांची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली.

मृत्यूपूर्व जबाब ठरला महत्वाचा

यात पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, इतर साक्षीदार, डॉक्टर तसेच तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची झाली. विशेष म्हणजे या खटल्यात मयत यांचा कार्यकारी दंडाधिकारी यांनी दवाखान्यात घेतलेला मृत्यूपूर्व जबाब देखील महत्त्वाचा ठरला. या खटल्या कामी युक्तिवाद करताना अॅड. गणेश पाटील यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष तसेच अभिलेखावर असलेल्या रासायनिक विश्लेषणाचे अहवाल आणि मृत्यूपूर्व जवाब यावर युक्तिवाद केला. त्याचप्रमाणे पुराव्यांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा आधार घेत आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची मागणी केली. साक्ष आणि पुराव्याच्या आधारावर न्यायाधीश बेग यांनी अब्दुल रमजान मन्यार यास दोषी धरून त्याला जन्मठेपेची शिक्षा तसेच दहा हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा दिली आहे. उर्वरित आरोपींना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. या खटल्यामध्ये जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news