कराड : पुढारी वृत्तसेवा पाटण तालुक्यातील सणबूर येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, घटनेचे कारण दुपारपर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते.
सेवानिवृत्त शिक्षक आनंदा पांडुरंग जाधव, सुनंदा आनंदराव जाधव, संतोष जाधव आणि पुष्पा धस अशी मृतांची नावे आहेत. सकाळी अकरा वाजेपर्यंत फोन करूनही कोणताच रिप्लाय येत नसल्याने आनंदा जाधव यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने संबंधितांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता आणि त्यामुळे ग्रामस्थांनी तो दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील चौघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेचे कारण अस्पष्ट असले तरी, घटनेबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडला आणण्यात येणार असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :