Zaira Wasim : लोक मला घुरत होते की, कधी मी नकाब काढते; दंगल गर्लचे स्पष्टीकरण

zaira wasim
zaira wasim
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'दंगल' फेम जायरा वसीम (Zaira Wasim) ने २०१९ मध्ये चित्रपट इंडस्ट्री सोडली होती. आता ती पुन्हा चर्चेत आलीय. जायराने एक ट्विट केले आहे. यामध्ये एका महिलेचा फोटो व्हायरल होतोय. ती बुरखामध्ये दिसत आहे आणि जेवताना ती आपले नकाब हटवत नाही. नकाब वर उचलून खातानाचा हा फोटो आहे. पण, या फोटोवरून जायरा ट्रोल होत आहे. (Zaira Wasim)

जायराने ट्विटरवर सांगितले की, एका लग्नाच्यावेळी लोक तिला घुरत होते की, ती कधी आपला नकाब काढेल. पण मी नकाब न हटवताच जेवले. ही प्रतिक्रिया तिने ट्विटरवर एका युजरच्या पोस्टवर दिलीय. या पोस्टमध्ये एक महिलेच्या समोर प्लेटमध्ये जेवण आहे. जेवतानाही ती नकाब काढत नाही. हे फोटो शेअर करताना प्रशिन उपस्थित करण्यात आलाय की, काय ही एका व्यक्तीची निवड आहे?

ही पोस्ट रिट्विट करताना जायरा वसीमने लिहिलं, "मी नकताच एका लग्नासाठी उपस्थित राहिले होते. मी देखील या पद्धतीनेच जेवले. ही माझी निवड होती. माझ्या चारी बाजून लोक मला घुरत होते की, कधी मी नकाब काढेन. पण मी माझा नकाब हटवला नाही. हे आम्ही तुमच्यासाठी करत नाही, यासाठी डील करणे शिका."

या पोस्टवर अनेक लोकांनी जायराचे समर्थन केलं आहे. काहींनी म्हटलंय की, तू योग्य आहेस. तर काहींनी जायराच्या विचारांवर प्रश्न उपस्थित केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news