दै. पुढारी-टोमॅटो एफएम शॉपिंग उत्सवचा लकी ड्रॉ उत्साहात

दै. पुढारी-टोमॅटो एफएम शॉपिंग उत्सवचा लकी ड्रॉ उत्साहात
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या काळात खरेदीसोबत लाखो रुपयांची बक्षिसे जिंकून देण्याची संधी देणार्‍या दै. 'पुढारी' – टोमॅटो एफएम आयोजित 'शॉपिंग उत्सव 2023'चा पहिला लकी ड्रॉ उत्साहात पार पडला. या ड्रॉमध्ये अर्धा तोळा सोन्याच्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी मूळचे सोलापूरचे व कोल्हापुरात नोकरीसाठी असलेले बालाजी हनुमंत हजारे आणि बांबरवाडी (ता. पन्हाळा) येथील अंजना पाटील हे ठरले आहेत.

व्हीनस कॉर्नर येथील मे. गोपिनाथ अनंत चिपडे सराफ यांच्या नव्याने सुरू झालेल्या शोरूममध्ये हा लकी ड्रॉ शनिवारी (दि.४) काढण्यात आला. सोन्याचे मानकरी ठरलेले बालाजी हजारे यांनी एस. एस मोबाईल्समध्ये आणि तर अंजना पाटील यांनी नॉव्हेल अप्लायन्सेस या दुकानातून खरेदी केली आहे.

यावेळी तनिष्कचे प्रसाद कामत, आविष्कार इन्फ्राचे संचालक अविनाश जाधव, मे. गोपिनाथ अनंत चिपडे सराफचे मुरलीधर चिपडे, प्रेम चिपडे, बालाजी कलेक्शनचे प्रशांत पोकळे, अनघा ज्वेल्सचे कुणाल लडगे, वरद डेव्हलपर्सचे यश चव्हाण, हीरा पन्नाचे यश माखिजा, कीर्ती सेल्सच्या ज्योती पाटील यांच्या हस्ते हा ड्रॉ काढण्यात आला.

यावेळी दै. 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, दै. 'पुढारी'चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, जाहिरात व्यवस्थापक (शहर) अतुल एकशिंगे, जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) जावेद शेख, सहायक जाहिरात व्यवस्थापक रिया भांदिगरे यांच्यासह जाहिरात प्रतिनिधी व ग्राहक उपस्थित होते.

प्रथम क्रमांक : बालाजी हजारे (कु. नं. 520) व अंजना पाटील (कु. नं. 16074).

द्वितीय क्रमांक (1 ग्रॅम सोने) : अर्चना माने (कु. नं. 6524), नियाज वाडिंगे (कु. नं. 14065), आर्चिज पाटील (कु. नं. 15817), श्रीधर पाटील (कु. नं. 5058) रोहिणी लांबे (कु. नं. 10112).

तृतीय क्रमांक (स्मार्ट फोन) : वैशाली वरुटे (कु. नं. 15369), शीतल शानवी (कु. नं. 9694), विद्या शेदुणीकर (कु. नं. 15825 ), श्रावणी काकडे (कु. नं. 1920), इंद्रनील जाधव (कु. नं.10137 ).

घटस्थापनेपासून सुरू झालेला पुढारी शॉपिंग उत्सव 2023 तुळशी विवाहापर्यंत सुरू राहणार आहे. या लकी ड्रा योजनेत सहभागी दुकानांतून खरेदी करणार्‍या ग्राहकांना कुपन दिले होते. या योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. या लकी ड्रॉमध्ये सोने, स्मार्ट फोन, ब्लेंडर या बक्षिसांठी विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.

माझा विश्वासच बसत नाही : हजारे

मी मूळचा सोलापुरचा आहे. पण सरकारी नोकरीनिमित्त कोल्हापुरात आहे. दै. 'पुढारी' वाचल्याशिवाय माझी दिवसाची सुरुवात होत नाही. 'पुढारी'च्या शॉपिंग उत्सवाचे कुपन मोबाईल खरेदी केल्यानंतर मी भरले. मी मित्रांना सांगत होतो, मला बक्षीस लागणार आहे. पण प्रत्यक्षात बक्षीस लागल्यावर मला त्यावर विश्वासच बसत नाही. माझ्या दिवाळीचा आनंद 'पुढारी'ने द्विगुणित केला आहे.

लवकरच बंपर ड्रॉ

विजेत्यांनी आपली कुपन्स जपून ठेवावीत. बक्षीस वितरणाची तारीख दै. 'पुढारी'मध्ये नंतर प्रसिद्ध केली जाईल. 30 नोव्हेंबर पर्यंत हा लकी ड्रॉ सुरू राहणार असून त्यानंतर या योजनेचा बंपर ड्रॉ काढण्यात येईल.

दिवाळीआधी कुटुंबात दिवाळीचा आनंद

मी आणि माझा मुलगा स्वप्नील एलईडी टीव्ही खरेदी करण्यासाठी कोल्हापुरात गेलो होतो. अनेक ठिकाणी ड्रॉ काढले जातात.
त्यामुळे त्यातून काही बक्षीस लागेल, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. दै. 'पुढारी'च्या योजनेतून आम्हाला अर्धा तोळे सोन्याचे बक्षीस मिळाले. यामुळे आमच्या कुटुंबाला दिवाळीपूर्वी दिवाळीचा आनंद झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news