Gosikhurd Project : मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला गोसे धरणाचा आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी करताना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी करताना
Published on
Updated on

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : गोसीखुर्द प्रकल्प  (Gosikhurd Project) येथील राजीव टेकडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१२) प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. पाटबंधारे विभागाच्या वतीने सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

Gosikhurd Project उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, अपर मुख्य सचिव जलसंपदा दीपक कपूर, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ श्रद्धा जोशी, कार्यकारी अभियंता विदर्भ पाटबंधारे महामंडळ आर. डी. मोहिते, मुख्य अभियंता गोसिखुर्द प्रकल्प आ. तू. देवगडे, अधीक्षक अभियंता गोसीखुर्द प्रकल्प मंडळ अ. का. देसाई, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग डॉ. प्र. ख. पवार आदी उपस्थित होते.

Gosikhurd Project : गोसीखुर्द प्रकल्पाविषयी माहिती

गोसीखुर्द प्रकल्पाला २६ फेब्रुवारी २००९ राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झाला आहे. प्रकल्पाची मूळ प्रशासकीय मान्यता किंमत ३७२.२२ कोटी आहे. तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता किंमत १८ हजार ४९४ कोटी ५७ लाख रुपये आहे. प्रकल्पाचे लाभ क्षेत्र २ लाख ५० हजार ८०० हेक्टर असून प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र २२ हजार २५८ हेक्टर आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा ११४६.०७५ द. ल. घ. मी. (४०.४७ टीएमसी) आहे. ९ जानेवारी २०२२ रोजी या धरणात शंभर टक्के पाणीसाठा निर्मिती झाली. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प जून २०२५ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता २ लाख ५० हजार ८०० हेक्टर असून जून २०२२ अखेर १ लाख ५२ हजार ७४३ हेक्टर सिंचन निर्मिती झाली. सन २०२२-२३ मध्ये २५ हजार, २०२३-२४ मध्ये ३५ हजार व २०२४-२५ मध्ये ३८ हजार ५७ हेक्टर सिंचन क्षमता निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

भविष्यातील नियोजन

गोसीखुर्द प्रकल्पातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करणे, लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी पीक पद्धतीत बदल व शेतमाल प्रक्रिया तसेच पूरक उद्योगांना चालना देणे, गोसीखुर्द जलाशयात पर्यटन विकास करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक व त्याद्वारे रोजगार निर्मिती व प्रकल्पाला सहकारी पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून लोकाभिमुख करणे, हे पाटबंधारे विभागाचे भविष्यकालीन नियोजन आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news