ChatGPT App | महत्त्वाची बातमी! ChatGPT मोबाईल अ‍ॅप लॉन्च; असे करता येणार डाऊनलोड

ChatGPT App | महत्त्वाची बातमी! ChatGPT मोबाईल अ‍ॅप लॉन्च; असे करता येणार डाऊनलोड
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : OpenAI ने आयफोनसाठी नुकतेच ChatGPT हे अ‍ॅप लॉन्च केले आहे, अशी माहिती OpenAI कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून दिली आहे. युजर्स आता या अ‍ॅपच्या माध्यामातून ChatGPT च्या सुविधा वापरू शकणार आहेत. चला तर हे अ‍ॅप कोणाला वापरता येणार?, यासाठी पैसे द्यावे लागणार काय? याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया…

ChatGPT ने जगभरात बोलबाला केला आहे. आपल्या अद्भुत क्षमतांनी ChatGPT ने प्रत्येकालाच हैराण केले आहे. या नव्याने येऊ घालतेल्या तंत्रज्ञानामुळे नोकरदारांमध्ये नोकरी जाण्याची भिती निर्माण झाली आहे, तर काहींनी या तंत्रज्ञानालाच पैसे कमावण्याचे माध्यम बनवले आहे. अश्यक्य वाटणारे कोणतेही काम ChatGPT हे तंत्रज्ञान अगदी सहज करू शकते. तुम्हाला देखील या तंत्रज्ञाना वापर करायचा असेल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे.

OpenAI ने iPhone युजर्ससाठी ChatGPT हे अ‍ॅप लॉन्च केले आहे. आता आयफोन युजर्स सहज आपल्या स्मार्टफोनमध्ये ChatGPT हे अ‍ॅप वापरू शकणार आहेत. सध्या OpenAI ने अमेरिकेत ही सेवा लॉन्च केली आहे. नियमित अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन युजर्ससाठी देखील लवकरच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

ChatGPT App : 'फ्री'मध्ये डाऊनलोड करा ChatGPT अ‍ॅप

ChatGPT हे स्टोअर अ‍ॅपवर 'फ्रि' मध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच हे अ‍ॅप पुर्णपणे अ‍ॅड फ्री असणार आहे. सध्या हे अ‍ॅप अमेरिकेत लॉन्च करण्यात आले आहे. येत्या काही महिन्या अन्य देशांमध्येदेखील हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले जाणार आहे. लवकरच अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल युजर्ससाठी देखील ChatGPT हे अ‍ॅप लॉन्च केले जाणार असल्याचे देखील कंपनीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news