Cancer : कॅन्सरने पाय गमावले, पण जिद्द सोडली नाही; जाणून घ्या तिचा एका नृत्यांगनेचा प्रवास

Cancer
Cancer
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तिने नृत्यात करिअर करण्याचा निर्धार केला होता, परंतु तिला कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासलं आणि तिचा पाय कापावा लागला. पाय निकामी झाला आणि तिचा नृत्यातील करिअर करण्याचा प्रवास जवळजवळ संपला अस तिला सोडून सर्वांना वाटत होतं. पण तिने न खचता तिची आवड जोपासली आणि आज एक यशस्वी नृत्य प्रशिक्षक बनली. हा प्रवास आहे सीता सुबेदी यांचा. जाणून घ्या नेपाळमधील ग्रामीण भागातील सीता सुबेदी यांचा यशस्वी नृत्यांगनेचा प्रवास. (Cancer)

Cancer : वयाच्या १२ व्या वर्षी कॅन्सरने पाय गमावला

मुळच्या नेपाळच्या असणाऱ्या सीता सुबेदी यांनी नृत्यात करिअर करण्याचा निर्धार केला होता. सीता सुबेदी नेपाळ मधील चितवन जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढल्या. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांना कॅन्सरने डावा पाय गमवावा लागला. एक पाय कापल्यामुळे त्यांची नृत्याची आवड आता बंद होणार अस वाटू लागलं सर्वांना. पण त्यांनी अनेक वर्षांच्या समर्पण आणि कष्टानंतर २०१८ साली नृत्य विषयात सुवर्णपदक मिळवले आणि या कठीण काळातूनही सुबेदींना चिकाटीचे फळ मिळाले. ती एक कुशल नृत्यांगना म्हणून समाजात उभी राहिली, तीही कथ्थक नृत्याच्या रूपाने. तिचा कॅन्सरने पाय गमावलेली सीता ते यशस्वी नृत्यांगना असा प्रवास सोपा नव्हता. या दरम्यान तिला तिचे सहकारी, शेजारी यांच्याकडून शिवीगाळ, भेदभाव आणि अवहेलना सहन करावी लागली. काहींना अस वाटत होत की, सीता यांच्यामुळे त्यांना कर्करोग होवू शकतो. अशा लोकांनी तिला त्यांच्यापासून लांब ठेवलं.

 नृत्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर…

तिला कॅन्सरचे निदान झाले आणि एकप्रकारची पोकळी तिच्या आयुष्यात निर्माण झाली. पण  नृत्याने ती पोकळी भरून काढली. सीता सांगतात, "मला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. मला नृत्य क्षेत्रात फक्त मनोरंजनासाठी नाही तर अभ्यास आणि व्यवसाय म्हणून या क्षेत्रात यायचे होते. मला असं वाटत की, नृत्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर माझ्या जीवनाचे एक साधन आहे ज्याने मला शैक्षणिकदृष्ट्याही नृत्य करण्यास प्रवृत्त केले,"  जेव्हा मी १२ वर्षांची होते, तेव्हा कॅन्सरमुळे मला माझा पाय कापावा लागला, त्यानंतर मी आयुष्याच्या बाबतीत उदासीन झाले. पाय नसल्याने नाचता येत नव्हते,  सामान्य जीवन जगता येत नव्हते.

Cancer
Cancer

Cancer : पायावर नृत्य करण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह

सीता सांगतात, "माध्यमिक शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मी माझ्या अस्तीत्वाच्या शोधात होते. मी अशा टप्प्यावर होते की, माझ्या  करिअरबद्दल निर्णय घेऊ शकेन. मी शिक्षण घेण्याचे निवडले.  भरतपूरला आल्यावर मी संगीत आणि नृत्याच्या आवडीबरोबरच अभ्यासही सुरू ठेवला." उल्लेखनीय बाब म्हणजे सीता मेघौली चितवन येथील जानकी उच्च माध्यमिक विद्यालयातून SLC परीक्षा उत्तीर्ण होण्याऱ्या  18 विद्यार्थ्यांपैकी एक आहेत. SLC उत्तीर्ण झाल्यानंतर लगेचच, त्यांना भरतपूरच्या स्थानिक नृत्य आणि संगीत शाळेत प्रवेश मिळाला. पण हा प्रवास एवढा सोपा नव्हता. त्यांना त्यांच्या शारीरिक समस्येवरुन  सामोरे जावे लागले. त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांची तुलना त्यांच्या इतर सहकारी प्रशिक्षणार्थींशी तुलना करत  एका पायावर नृत्य करण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पुढे  नृत्य आणि संगीत संस्थेने औपचारिक प्रवेश घेतल्यानंतर एका महिन्याच्या आत वर्गासाठी येणे थांबवण्यास सांगितले. काठमांडूमध्ये तिचे जीवन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यावर नृत्य गुरूंकडून असंख्य नकारांना सामोरे जावे लागले. तिला नृत्य शैलीसाठी अयोग्य मानले.

घरच्यांनीही नृत्य करण्यास केला होता विरोध

सीता सांगतात," तिच्या स्वप्नाचा भंग होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. तिला कॅन्सर होण्याच्या अगोदर तिच्या नृत्याची आवड कुटुंबालाही आवडली नाही. तिच्यावर बंधन आणण्यात आली होते.

…मला एक दशकाची वाट पहावी लागली

सीता सांगतात, "पाय गमवावा लागण्यापूर्वी मी नृत्य करत होते. पण पाय काढण्यानंतर नृत्यातील पुन्हा सराव आणि शिकण्यासाठी एका दशकाची प्रतीक्षा करावी लागली. मला काठमांडूला आल्यानंतरच संधी मिळाली, तीही माझी दुसरी पदवी पूर्ण करताना. जेव्हा मी माझा प्रमुख विषय म्हणून संगीत निवडले तेव्हा माझे संगीत गुरू धन बहादूर गोपाली यांनी मला नृत्य शिकावे असे सुचविले. त्यांनी मला नृत्याच्या वर्गात प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर मी माझ्या नृत्याच्या प्रवास सुरु केला जो खूप पूर्वी थांबला होता.सीता यांचे नृत्य शिक्षक रबी राणा मगर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, "सुरुवातीला देहबोलीशी संबंधित काही अडचणी होत्या पण सततच्या सरावामुळे ती बदलत गेली. ती अर्थ समजून घेते आणि पावले दुरुस्त करण्याची नेहमीच तत्पर असते.

सुधा चंद्रन आणि 'नाचे मयुरी'

अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर सीता या २०१८ साली नृत्य विषयात सुवर्णपदक मिळवले. आता त्या त्यांच्या स्टुडिओमध्ये अर्धा डझन विद्यार्थ्यांना कथ्थक शिकवणारी एक प्रशंसित नृत्य प्रशिक्षक बनली आहे. त्या बोलताना सांगतात, "यशासाठी तुम्ही तुमची मेहनत आणि निष्ठा चालू ठेवावी,. सुबेदी यांची कहाणी अनेकांना सुधा चंद्रन यांच्यावर १९८६ मध्ये बनलेल्या 'नाचे मयुरी' या  चित्रपटाची आठवण करून देते. एका अपघातात चंद्रन यांना त्यांचा पाय गमवावा लागला होता. त्यांनीही या समस्येवर मात करत  कुशल भरतनाट्यम नृत्यांगना बनल्या.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news