पुढारी ऑनलाईन डेस्क : Breaking News : बिहारमधील औरंगाबाद येथे छठ पूजा (Chhath Puja) करताना आज सकाळी (दि.२९) गॅसचा स्फोट झाला. या स्फोटामुळे दोन मजली इमारतीला आग लागली. या भीषण आगीत ३० हून अधिक लोक जखमी झाले तर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणारे पोलिसही जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Breaking News : माहितीनुसार, औरंगाबादमधील (बिहार) शाहपूर परिसरातील हा भीषण स्फोट झाला. प्रभाग क्रमांक 24 मधील अनिल गोस्वामी यांच्या घरी छठ पूजा सुरू होती. छठ पूजेचा प्रसाद ज्या गॅसवर करत होते तिथे गॅस गळती झाल्याने गॅसचा स्फोट झाला. यावेळी घरात बरेच लोग उपस्थित होते. यात 3५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी काही लोक गंभीर जखमी आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत.
अद्याप तरी कोणाच्याही मृत्यूची सूचना आलेली नाही. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात देण्यात येईल…
हेही वाचा