पुढारी ऑनलाईन डेस्क : bollywood dark secrets : बॉलिवूडमधील झगमगाट अनेकांना हवाहवासा वाटत असला, तरी तेथील हलकटपणा फार कमी लोकांनीच पाहिला आहे. त्या ठिकाणी नशेडी लोकांची गँगच होऊन गेली आहे. मी टू प्रकरणाने बॉलिवू़डमधील काळ्या दुनियेवर चांगलाच प्रकाशझोत टाकला गेला.
त्यामुळे ]अनेकांचे हात गुंतले आहेत. जे सापडले ते समोर आले बाकी मोकाट अशी अवस्था बॉलिवुडमधील आहे. चमकणारे ते सर्व सोने असते याची प्रचिती बॉलिवुडमध्ये आल्याशिवाय राहत नाही.
आज आम्ही तुम्हाला अशा सेलेब्सबद्दल सांगणार आहोत जे बेकायदेशीर काम करताना रंगेहाथ पकडले गेले bollywood dark secrets आणि काही मिनिटांत त्यांचा सर्व सन्मानही गळून पडला.
2011 मध्ये शायनी आहुजावर त्याच्या मोलकरणीने बलात्काराचा आरोप केला होता. शायनी दोषी आढळला आणि त्याला 7 वर्षांची शिक्षा झाली. 2015 च्या वेलकम बॅक चित्रपटात त्यांने छोटी भूमिका केली होती, पण प्रेक्षकांना ती आवडली नाही. या घटनेनंतर शायनी आहुजाची चित्रपट कारकीर्द उद्ध्वस्त झाली.
2005 मध्ये दिवाने हुए पागलच्या शूटिंग दरम्यान, विजय राजला अबू धाबी पोलिसांनी ड्रग्जसह पकडले होते. आजकाल विजय राज चित्रपटांमध्ये क्वचितच दिसतो.
2014 मध्ये श्वेता बसू प्रसाद वेश्याव्यवसायात गुंतलेली आढळली. हैदराबाद येथील एका हॉटेलमध्ये तिला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. नंतर तिला सुधारगृहात पाठवण्यात आले. आता श्वेता या गोष्टींपासून दूर आहे आणि तिच्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे.
'राम तेरी गंगा मैली हो गई' फेम मंदाकिनी आणि गुंड दाऊद इब्राहिमची काही छायाचित्रे लीक झाल्यानंतर खळबळ उडाली होती. दोघांचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या लिंकअपच्या बातम्या समोर येऊ लागल्या. यानंतर तिची फिल्मी कारकीर्दही उद्ध्वस्त झाली. या घटनेनंतर मंदाकिनीने चित्रपट जगतात पुनरागमन केले, पण निराशाच झाली.
अमन वर्माने टीव्हीच्या जगात चांगले नाव कमावले होते. चित्रपटसृष्टीतही त्याने बरेच प्रयत्न केले, पण एका स्टिंग ऑपरेशनने त्याचे जग हादरून गेले. एका वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अमन वर्मा एका मुलीला काम देण्याच्या बहाण्याने सेक्सची मागणी करताना पकडला गेला.
स्टिंग ऑपरेशन दरम्यान शक्ती कपूरची सुद्धा बरीच चर्चा रंगली होती. 2005 मध्ये एका टीव्ही रिपोर्टरला शक्ती कपूरने शिवीगाळ केली होती. शक्ती कपूर म्हणायचा, 'मला तुला प्रेम द्यायचे आहे आणि जर तुला फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचे असेल, तर मी तुम्हाला जे करायला सांगतो ते करावे लागेल.' 'यानंतर शक्ती कपूरवर अनेकांनी ताशेरे ओढले.
पॉर्न फिल्म बनवल्याप्रकरणी राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. राज कुंद्राला न्यायालयाने 23 जुलै (2021) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. राज कुंद्रा एका परदेशी अॅपसाठी पॉर्न फिल्म बनवायचे, ज्याचे चित्रीकरण मुंबईतील मड आयलँड परिसरात झाले.
2001 मध्ये फरदीन खान कोकेन खरेदी करताना पकडला गेला. पोलिसांनी त्याला मुंबईतील जुहू परिसरात अटक केली.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला अटक करण्यात आली होती. संजयच्या घरातून एके 56 रायफलसह इतर अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात संजयने तुरुंग आणि कोर्टाच्या अनेक फेऱ्याही केल्या.
रिपोर्ट्सनुसार, ममता कुलकर्णीने दुबईस्थित अंडरवर्ल्ड ड्रग माफिया विकी गोस्वामीशी लग्न केले. मात्र, ममता नेहमीच तिच्या लग्नाची बातमी अफवा असल्याचे सांगून फेटाळून लावते. ममता विकीसोबत 10 वर्षे दुबईत राहिली. असेही म्हटले जाते की अभिनेता पती विक्कीसोबत ती अनेक बेकायदेशीर कामांचाही एक भाग बनली आहे.
अंडरवर्ल्डमुळे ममताला अनेक सुपरहिट चित्रपट मिळाल्याचे मानले जाते. अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांमुळे ममता अधिक चर्चेत होती. एकेकाळी आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड स्टाईलने मथळे बनलेल्या ममता कुलकर्णी आता साध्वी झाली आहे.
2016 मध्ये ममता कुलकर्णी आणि तिचा पती विक्की गोस्वामीला पोलिसांनी केनिया विमानतळावर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी अटक केली होती. मात्र, नंतर सोडून देण्यात आले. ममता कुलकर्णीचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबत संबंध होते असेही म्हटले जाते.
हे ही वाचलं का?