bollywood affair : या ७ स्टार कपलमध्ये तिसरा आला आणि सोन्यासारखा संसार मोडला!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

बॉलिवुडमध्ये (bollywood affair) नाती कधी जोडली जातील आणि कधी मोडली जातील याचा नेम नसतो. साऊथमधील सेलिब्रेटी कपल समंथा आणि नागा चैतन्य यांच्या चार वर्षांच्या संसारानंतर काडीमोड झाला आहे. बॉलिवूडमध्ये प्रेमाला बहर कधी येईल आणि त्याचा शेवट कधी होईल हे सांगणे त्यामुळे कठिण होऊन गेले आहे. मलायका अरोरा हे सुद्धा त्याचेच उदाहरण.

हसत्या खेळत्या संसाराचा शेवट होणे यासाठी बॉलिवूडमध्ये तिसरा किंवा तिसरी कारणीभूत असल्याचे बऱ्याचवेळा दिसून आले आहे. वैवाहिक आयुष्य या भोळसटपणामुळे उद्ध्वस्त झाले आहे. लग्नानंतरही लफडी करणे यामुळेही बरीच नाती विस्कटून गेली आहेत. आज आपण अशाच तुटलेल्या ७ जोड्यांची माहिती घेणार आहोत.

समांथा अक्किनेनी- नागा चैतन्य

साउथमधील सुप्रसिद्ध कपल समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांनी अलीकडेच घटस्फोटाची घोषणा केली. बातमीनुसार, नागा चैतन्यने समंथा अक्किनेनीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे (bollywood affair) त्याला सोडले आहे. समंथा अक्किनेनीचे नाव सतत तिचा डिझायनर मित्र प्रीतम जुकलकरशी जोडले जात आहे.

अहवालांनुसार, समंथाच्या प्रीतम जुकलकरसोबत वाढत्या मैत्रीवरून स्टार जोडप्यामध्ये खूप तणाव निर्माण झाला होता. प्रीतममुळे, सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांच्यातील भांडणे इतकी वाढली की शेवटी दोन्ही स्टार्सनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

आमिर खान आणि किरण राव

काही दिवसांपूर्वीच आमिर खान आणि किरण राव यांनीही घटस्फोटाची घोषणा केली. आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. आमिर खान आणि किरण राव यांनी आजपर्यंत खुलासा केला नसला तरी त्यांच्या वेगळे होण्याचे कारण काय आहे. त्याचबरोबर मीडिया रिपोर्ट्समध्ये या घटस्फोटाचे कारण बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख (bollywood affair) असल्याचे सांगितले जाते.

मलायका अरोरा आणि अरबाज खान

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी एकमेकांना ५ वर्षे डेट केल्यानंतर १९९८ मध्ये लग्न केले. २०१४ मध्ये मलायका अरोराचे नाव अर्जुन कपूरशी जोडले जाऊ लागले. ही बातमी समोर आल्यानंतर मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी त्यांचे १९ वर्षांचे नाते संपवले. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या नात्यात अर्जुन कपूरने (bollywood affair) खडा टाकल्याचे मानले जाते.

हृतिक रोशन आणि सुझान खान

हृतिक रोशनने त्याची बालपणीची मैत्रीण सुझान खानशी लग्न केले. हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी लग्नाच्या १४ वर्षानंतर एकमेकांना घटस्फोट दिला. सुझान खान हृतिक रोशनच्या लफड्यामुळे विभक्त झाल्याचा दावा केला जात आहे. सुजैन खान आणि हृतिक रोशनच्या घटस्फोटामागे कंगना रनौत हेच कारण असल्याचे म्हटले जाते. कंगना रनौतच्या आधी हृतिक रोशनचे नावही बार्बरा मोरीशी जोडले गेले आहे.

सैफ अली खान आणि अमृता सिंग

सैफ अली खानने स्वतः बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगसोबत १२ वर्षांनी मोठी असतानाही लग्न केलं. लग्नानंतर काही वेळातच सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्या आल्या. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, सैफ अली खानचे त्या दिवसात इटालियन मॉडेल रोझा कॅटालानोसोबत विवाहबाह्य (bollywood affair) संबंध होते. असे मानले जाते की या अफेअरमुळे सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा घटस्फोट झाला. नंतर, करीना कपूरने सैफ अली खानच्या आयुष्यात प्रवेश केला.

कमल हासन आणि गौतमी ताडीमल्ला

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर कमल हासनने बॉलिवूड अभिनेत्री सारिकाशी लग्न केले. आई झाल्यानंतर सारिकाने बॉलिवूडला निरोप दिला. सारिका आणि कमल हसन यांचाही २००२ मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोट घेतल्यानंतर कमल हासनचे नाव बॉलिवूड अभिनेत्री सिमरन बग्गासोबत जोडले जाऊ लागले. दरम्यान, गौतमी ताडीमल्लाने कमल हासनच्या आयुष्यात प्रवेश केला. कमल हासन आणि गौतमी ताडीमल्ला २००५ ते २०१६ पर्यंत लिव्ह-इनमध्ये होते. २०१६ मध्ये त्यांच्या नात्यात दुरावा आला.

धर्मेंद्र- प्रकाश कौर

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी धर्मेंद्रने प्रकाश कौरशी आधीच लग्न केले होते. हेमा मालिनी यांनी चित्रपटांमध्ये काम करताना धर्मेंद्रच्या आयुष्यात प्रवेश केला. धर्मेंद्रला प्रकाश कौरला घटस्फोट द्यायचा होता. मात्र, प्रकाश कौरने धर्मेंद्रसोबत वेगळे होण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत धर्मेंद्रने इस्लाम स्वीकारला आणि हेमा मालिनीशी लग्न केले.

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news