Operation Lotus: आता भाजपकडून ‘या’राज्यात राबवले जाणार ‘ऑपरेशन लोटस’

नितीश कुमार
नितीश कुमार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रात रविवारी राजकीय भूकंप झाला. राष्‍ट्रवादीत उभी फूट पडली आहे. आता अशाच प्रकारची राजकीय उलथापालथ  बिहारमध्येही होऊ शकते.  संयुक्‍त जनता दलाचे (जेडीयू) प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर अनेक आमदार नाराज आहेत. ते 'एनडीए'मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच समाजवादी पक्षाच्या आमदारांमध्ये देखील मतभेद आहेत, त्यामुळे बिहारमध्ये (Operation Lotus) देखील भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत आहेत, असे वृत्त 'इंडिया टुडे'ने आहे. दरम्‍यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही 'एएनआय'शी बाेलताना याला दुजाेरा दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्‍यासह ९ जणांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्‍यांच्‍या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) संकटात सापडला आहे. त्यानंतर बिहारमध्ये देखील अशी स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून बिहारमधील राजकीय घडामाेडींचे विश्लेषण केले असता, अनेक राजकीय घटना घडताना दिसत आहेत. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखे राजकीय संकट येऊ शकते. नितीश कुमार (Operation Lotus) पुन्हा एकदा 'एनडीए'मध्ये पुनरागमन करू शकतात, अशीही शक्यता व्‍यक्‍त हाेत आहे.

Operation Lotus: बिहारमध्ये देखील महाराष्ट्रासारखी स्थिती; आठवले

सध्या बिहारमध्ये देखील महाराष्ट्रारखीच परिस्थिती उद्भवू शकते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर काही आमदार नाराज असून ते एनडीएच्या वाटेवर आहेत. यूपीध्ये देखील जयंत चौधरी सध्या अखिलेश यादव यांच्यावर नाराज असल्याने ते एनडीएमध्ये सामील होऊ शकतात. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या आमदारांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) खासदार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे बिहारमध्ये देखील अशी स्थिती उद्भवू शकते, याला त्‍यांनी दुजोरा दिला आहे.

अमित शहांची भूमिका देखील नरमली

नितीशकुमार यांनी भाजपशी फारकत घेतल्यापासून  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या दहा महिन्यांत पाच वेळा बिहारला भेट दिली आहे. प्रत्येक प्रसंगी त्यांनी आपल्या भाषणात नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद असल्याचे जाहीर केले हाेते. मात्र २९ जून रोजी अमित शहा यांनी बिहारमधील लखीसरायला भेट दिली. तेव्हा येथील कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी नितीश कुमार यांच्याबद्दल एकही भाष्य केले नाही, यावरून नितीशकुमार यांच्याबद्दलची भाजपची भूमिका देखील नरमली असल्याचे पाहायला मिळात आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news