दोन चिमुकल्यांसह आईने घेतले विष, मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू : आईसह मुलीची प्रकृती गंभीर

दोन चिमुकल्यांसह आईने घेतले विष, मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू : आईसह मुलीची प्रकृती गंभीर
Published on
Updated on

भंडारा : पुढारी वृत्तसेवा

दोन चिमुकल्यांसह आईने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी पहाटे भंडारा तालुक्यातील ठाणा (पेट्रोलपंप) येथे उघडकीस आली. १४ महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आई व मुलीला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्तिक ज्ञानेश्वर शहारे (१४ महिने) असे मृत मुलाचे नाव आहे. तर वंदना ज्ञानेश्वर शहारे असे आईचे तर विधी ज्ञानेश्वर शहारे असे मुलीचे नाव आहे.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वंदना हिने आपली मुले कार्तिक व विधी यांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलगा कार्तिकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर वंदना आणि विधी यांना गंभीर अवस्थेत नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वंदना यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत माहिती मिळू शकली नाही. तपास जवाहरनगर पोलिस करीत आहेत.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news