Baahubali Samosa : आता आला ‘बाहुबली समोसा’!

Baahubali Samosa
Baahubali Samosa
Published on
Updated on

मेरठ : मोठ्या आकाराचे खाद्यपदार्थ अर्थातच लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यामधून संबंधित दुकान, हॉटेल किंवा धाब्याचीही प्रसिद्धी होत असते. मोठ्या आकाराचे पराठे, डोसे आणि बर्गरही पाहायला मिळतात. आता मेरठमधील एका मिठाईच्या दुकानात 'बाहुबली समोसा' (Baahubali Samosa) तयार करण्यात आला आहे. हा समोसा तब्बल बारा किलो वजनाचा आहे. तो तुम्ही तीस मिनिटांत खाल्ला तर तुम्हाला 71 हजार रुपयांचे बक्षीस मिळेल!

कौशल स्वीटस् नावाच्या दुकानात हा बाहुबली समोसा (Baahubali Samosa) बनवण्यात येतो. कौशल स्वीटस्च्या तिसर्‍या पिढीचे मालक शुभम कौशल यांनी सांगितले की त्यांना समोशाला लोकांचे आकर्षण बनवण्याची इच्छा होती. त्यामधूनच या 12 किलोच्या समोशाची संकल्पना पुढे आली. कौशल यांनी सांगितले की या बाहुबली समोशाची क्रेझ इतकी आहे की अनेक लोक आपल्या वाढदिवसाला पारंपरिक केकऐवजी असा बाहुबली समोसा कापणे पसंत करतात.

हा समोसा (Baahubali Samosa) तयार करण्यासाठी साधारणपणे सहा तासांचा वेळ लागतो. तो कढईत तळण्यासाठीच दीड तासाचा वेळ लागतो. तिघेजण मिळून हा समोसा बनवतात. या बाहुबली समोशासाठी आधी बुकिंग करावे लागते. बारा किलो वजनाच्या या समोशाची किंमत दीड हजार रुपये आहे. अनेक फूड ब्लॉगर व सोशल मीडिया इन्फ्लुएन्शर्समुळे हा समोसा प्रसिद्ध झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news