Avalanche Hits in Jammu And Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलन; ३ जवान शहीद

Avalanche Hits in Jammu And Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलन; ३ जवान शहीद
Published on
Updated on

श्रीनगर; पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा माछिल भागात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या हिमस्खलनाच्या तडाख्यात ३ जवान शहीद झाले. त्याचबरोबर 2 जवानांना बर्फाखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. ही घटना घडली तेव्हा 56 राष्ट्रीय रायफल्सचे हे पाच जवान नियमित गस्तीवर होते. अधिका-यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र जवानांना बाहेर काढेपर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला होता. इतर 2 जवानांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. (Avalanche Hits in Jammu And Kashmir)

कुपवाडाच्या एसएसपी युगल मन्हास यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, जवानांचे मृतदेह बर्फातून बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेहांना 168 एमएच ड्रगमुल्ला येथे हलवण्यात आले आहे. शहीद जवानांची ओळख पटली असून सोविक हाजरा, मुकेश कुमार आणि गायकवाड मनोज लक्ष्मणराव हे जवान शहीद झाले आहेत. (Avalanche Hits in Jammu And Kashmir)

नियमित गस्तीदरम्यान अपघात (Avalanche Hits in Jammu And Kashmir)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी संध्याकाळी लष्कराच्या 56 राष्ट्रीय रायफल्सचे जवान कुपवाडा जिल्ह्यातील माछिल भागात नियमित गस्त घालत होते. जवान गस्त घालत होते, तिथे बर्फ पडला होता. गस्तीदरम्यान बर्फाचा मोठा खडक लष्कराच्या जवानांवर पडला.

याआधी फेब्रुवारीमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये हिमस्खलनात लष्कराचे ७ जवान शहीद झाले होते. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सैनिक दोन दिवस बर्फात अडकले होते, त्यानंतर त्यांचे मृतदेह बर्फातून बाहेर काढण्यात आले होते.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news