FIFA WC 2022 : क्रिकेटर अश्विनची युरोपच्या ‘या’ दिग्गज संघासाठी प्रार्थना

FIFA World Cup 2022
FIFA World Cup 2022
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल प्रेमींचा सर्वात मोठा सण म्हणजेच फुटबॉल विश्वचषक स्पर्धा (FIFA World Cup 2022). ही स्पर्धा २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडियाचे क्रिकेटर्सही फुटबॉलचे मोठे चाहते आहेत. ते त्यांच्या आवडत्या संघाला आणि खेळाडूंना स्पर्धेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विनने फुटबॉलमधील आपल्या आवडत्या संघाचे नाव जाहीर केले असून आपण मी त्या संघाला विश्वचषक स्पर्धेत पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.

आर. अश्विनचा आवडता संघ कोणता?

अश्विन म्हणाला, 'मी फुटबॉलचा चाहता आहे. मी फुटबॉलचे सामने खूप आवडीने पाहतो. मी नेहमीच स्पेनच्या संघाचा चाहता राहिलो आहे. या विश्वचषकात स्पॅनिश संघाची कामगिरी कशी असेल हे मला माहीत नाही, पण, या संघाला खेळताना पाहणे मला नेहमीच आवडते. २०१८ साली झालेला विश्वचषक अतिशय रोमांचक होता. फ्रान्सच्या एमबाप्पेला अंतिम सामन्यात खेळताना पाहणे आश्चर्यकारक होते. मला आशा आहे की या विश्वचषकातही अनेक युवा खेळाडूंचा खेळ जगाला पाहता येईल.

कतारमध्ये फिफा विश्वचषक २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ३२ संघ सहभागी होत असून त्यांची ८ गटात विभागणी केली आहे.  प्रत्येक गटात ४ संघ आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे. सलामीचा सामना यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात  होणार आहे. कतारला पहिल्यांदाच विश्वचषकाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा प्रथमच आखाती देशात होत आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news