Deepfake : डीपफेक प्रकरणानंतर माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये सुधारणा करण्याची शक्यता

Deepfake : डीपफेक प्रकरणानंतर माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये सुधारणा करण्याची शक्यता
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Deepfake : वारंवार होत असलेल्या डीपफेक प्रकरणानंतर येत्या सात ते आठ दिवसांत माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये सुधारणा करण्याची शक्यता आहे. तसेच डीपफेकची स्पष्ट व्याख्या करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालय माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ मध्येही सुधारणा करण्याचा विचार करत आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत मंगळवारी माहिती दिली.

राजीव चंद्रशेखर म्हणाले की, सरकारने सर्व मध्यस्थांशी "डिजिटल इंडिया" संवादाच्या दोन फेऱ्या केल्या आहेत. आम्ही सध्याच्या नियमांकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच नियम न पाळल्याचे काय परिणाम होऊ शकतील याकडेही वेधले आहे. या संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. तंत्रज्ञानाचा फायदा नवीन आव्हाने आणि हानी देखील आणतो, असेही ते म्हणाले.

आमची धोरणे, नियम आणि दृष्टीकोन हे सुरक्षित आणि जबाबदार इंटरनेटचे आहेत. प्रत्येक भारतीयाला इंटरनेटवर सुरक्षितता आणि विश्वास देणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही त्यासाठी नियम आणि कायदे बनवू. मात्र डीपफेक ही त्या त्या प्लॅटफॉर्मची जबाबदारी आहे. जर प्लॅटफॉर्म चुकत असेल तर आम्ही कारवाई करू. चुकीच्या लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊ देऊ नये ही प्लॅटफॉर्मची जबाबदारी आहे. प्लॅटफॉर्म नियम पाळत नसतील तर आम्ही प्लॅटफॉर्मला बंद करू शकतो कारण नागरिकांची सुरक्षितता हि सर्वात महत्वाची आहे, असेही ते म्हणाले. डीपफेक व्हिडिओ कृत्रीम बुद्धिमत्ता वापरून तयार केलेले सिंथेटिक माध्यम आहेत, जे खात्रीलायक दिसणार्‍या बनावट प्रतिमा, व्हिडिओ किंवा ऑडिओ तयार करतात. जे आपल्यासा सहसा लक्षात येत नाहीत. यासाठी सरकार विशेषतः तीन सुधारणांवर विचार करत आहे. हेही त्यांनी सांगितले.

सचिन तेंडुलकरला डीपफेक व्हिडिओचा फटका

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोमवारी सोशल मीडियावर माहिती दिली की, मोबाईल ॲप्लिकेशनची जाहिरात करणारा त्याचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. डीपफेक व्हिडिओचा फटका आता सचिन तेंडुलकरलाही बसला आहे. तंत्रज्ञानाचा असा सर्रास गैरवापर होणे हे अस्वस्थ करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सचिन तेंडुलकर म्हणाले की, सोशल मीडियावर फिरत असलेले त्यांचे व्हिडिओ बनावट आहेत. तंत्रज्ञानाचा सर्रासपणे होणारा गैरवापर पाहणे अस्वस्थ करणारे आहे. मोठ्या संख्येने असे व्हिडिओ आणि जाहिरातीची तक्रार करण्याची विनंतीस त्यांनी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सतर्क राहून तक्रारींना प्रतिसाद देण्याची गरज आहे. चुकीची माहिती आणि डीपफेकचा प्रसार रोखण्यासाठी त्यांच्याकडून जलद कारवाई करणे महत्त्वपूर्ण आहे, असेही सचिन तेंडुलकरने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news