मराठवाडा : ४७ नगरपरिषदांवर होणार प्रशासक नियुक्त

मराठवाडा : ४७ नगरपरिषदांवर होणार प्रशासक नियुक्त
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा

मराठवाड्यातील 47 नगरपरिषदांच्या लोकनियुक्‍त प्रतिनिधींची मुदत संपताच त्याठिकाणी प्रशासक नेमण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. या नगरपरिषदांच्या अध्यक्ष व नगरसेवकांची मुदत नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात संपली असून, तेथे आगामी काळात निवडणुका अपेक्षित होत्या. परंतु कोरोनाचे कारण दाखवून या निवडणुकांची तारीख घोषित न करता प्रशासक नेमण्याचे शासनाने ठरवले आहे. याबाबतचे आदेश सोमवारी जारी झाले असून, निवडणूक आयोग, विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकार्‍यांना प्रधान सचिव महेश पाठक यांच्या स्वाक्षरीचे पत्र पाठविण्यात आले आहे.

  • औरंगाबाद जिल्ह्यातील कन्‍नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद,
  • जालना जिल्ह्यामधील जालना, अंबड, भोकरदन, परतूर,
  • परभणीतील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, सोनपेठ
  • हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरीत प्रशासक नेमले जातील.
  • बीड जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी, वैजनाथ, गेवराई आणि धारूर,
  • नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, माहूर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी या नगरपरिषदांवर प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात येणार आहे.
  • उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, उमरगा, परंडा, तुळजापूर,
  • लातूर जिल्ह्यात उदगीर, अहमदपूर, औसा आणि निलंगा येथे प्रशासकांच्या नियुक्त्या होणार आहेत. मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी अथवा तहसीलदार यांना प्रशासकपदाचा कार्यभार देण्यात येईल.

या नगरपरिषदांच्या निवडणुका 2016 मध्ये झाल्या होत्या. नगरविकास खात्याच्या नियमानुसार नगरपरिषद निवडणूक निकालानंतर झालेल्या पहिल्या सभेपासून निर्वाचित सदस्यांचा कालावधी गृहित धरण्यात येतो. बीड व काही नगरपरिषदांची पहिली सभा जानेवारी 2017 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुका जानेवारी किंवा फेब्रुवारीत अपेक्षित होत्या.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news