पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघेजण लवकरच लग्न बंधनात ( Athiya Shetty Wedding ) अडकणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी यांनी कॅमेऱ्यासमोर येत उद्या म्हणजे, २३ जानेवारी २०२३ रोजी सर्वाची भेट होणार असल्याची माहिती दिली. यावरून अथिया आणि के. एल. राहुल उद्या खंडाळा येथील फार्महाईसवर लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र दोन्ही कुटुंबीयांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सुनील शेट्टीचा नुकताच खंडाळा हार्महाऊसजवळचा एक व्हिडीओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. यामध्ये सुनील शेट्टी आपल्या कारमधून खाली उतरताना दिसतात. यानंतर पॉपाराझीच्या कॅमेऱ्यासमोर येतात. 'उद्या भेटण्यास कुटुंबीय आणि मुलांना घेवून येतो, इतके प्रेम केल्याबद्दल धन्यवाद.' असे म्हणतात. यावरून अथिया आणि के. एल. राहूल याचे उद्या म्हणजे, २३ जानेवारी २०२३ रोजी लग्न होणार असल्याची माहिती मिळत आहे. या लग्नाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या विवाह सोहळ्याला अनेक मान्यवर साताऱ्यातील खंडाळा फार्महाऊसवर पोहोचणार असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
हेही वाचा :