अबोल प्रीतीची अजब कहाणी : अभिनेता अजिंक्य राऊतचं टीव्हीवर कमबॅक

अबोल प्रीतीची अजब कहाणी
अबोल प्रीतीची अजब कहाणी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : निरनिराळे विषय आणि रंजक मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. त्यातील आगळेवेगळे विषय कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. मालिकेतील काही व्यक्तिरेखा कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. तशीच एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे.

'अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. त्याची पहिली झलक नुकतीच पाहायला मिळते आहे. प्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या मालिकेतून टेलिव्हिजनवर कमबॅक करतो आहे. त्याच्याबरोबर गुणी अभिनेत्री जान्हवी तांबट हीसुद्धा या मालिकेतून विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळते आहे. आता ही 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' लपूनछापून कशी फुलतेय हे नक्कीच पाहायला मिळेल.

अभिनेता अजिंक्य राऊत पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचे या आधीचे काम प्रेक्षकांना विशेष आवडले. त्याच्या नव्या भूमिकेची त्याचे चाहते मनापासून वाट पाहत होते. अजिंक्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेतून दिसणार आहे. मालिकेचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना विशेष आवडतो आहे कारण मालिकेची नायिका जान्हवी तांबट ही वेगळ्या रूपात दिसते आहे. ती चक्क एका बॉडीगार्डच्या वेशात आपल्याला दिसते आहे, तेही पुरुष बॉडीगार्डच्या वेशात. आता हा बॉडीगार्ड कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईल, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. या मालिकेत अजून कोण कलाकार असतील आणि एकंदर मालिका कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईल याची प्रेक्षक वाट बघताहेत. ही मालिका १७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news