परभणी : पत्नीचा खून करुन कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या - पुढारी

परभणी : पत्नीचा खून करुन कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

परभणी; पुढारी वृत्तसेवा

पालम तालुक्यातील पूयणी या गावात शेतकरी रंगनाथ हरिभाऊ शिंदे यांनी अआपल्‍या पत्‍नीचा खून करुन नंतर गळफास लावून घेवून आत्‍महत्‍या केली.  कर्जास कंटाळून, तसेच निसर्गाच्या अवकृपेने शेतीचे नुकसानीमुळे त्‍यांनी हे कृत्‍य केल्‍याची चर्चा  आहे.

रंगनाथ शिंदे यांना चार ते पाच एकर जमीन असून, दोन मुले आहेत. रंगनाथ यांनी याच वर्षी बैलजोडी घेतली.  दूध व्यवसायासाठी एक म्हैस घेतली होती.  यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने सोयाबीनचे पीक, तूर आणि मूग गेली. आता आपण कर्ज कसे फेडायचे,  अशी चिंता त्‍यांना लागून राहिली होती. याबद्दल ते इतरांशी चर्चा करत होते. मात्र कर्जाची परत फेड होत नसल्याने ते चिंतेत हाेते.

रंगनाथ यांनी रविवारी रात्री पत्‍नीचा गळा दाबून खून केल्‍यानंतर स्‍वत: गळफास लावून घेत आत्‍महत्‍या केली. या घटनेची फिर्याद रंगनाथ त्‍यांचे  मोठे भाऊ संतोष हरीभाऊ शिंदे यांनी दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button