‘प्रयोग' बनले कोल्हापूरकरांचे हक्‍काचे व्यासपीठ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

गौरवशाली 83 वर्षांची परंपरा लाभलेला दै. ‘पुढारी’ सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीत नेहमीच अग्रेसर असतो. संस्थने ‘प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वसा जपला आहे. कोल्हापूरकरांच्या हक्काचे  व्यासपीठ बनलेला ‘प्रयोग’ समाजाप्रती असणार्‍या बांधिलकीतून अनेक सामाजिक उपक्रम राबवितो. विविध संस्‍था, संघटनांसह शाळा, महाविद्यालयात राबवलेल्या उपक्रमांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. दै.‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन केले जात असून, वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या 57 शाळांमध्ये इ-लर्निंग उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येत आहे.

2021 या वर्षात यशस्वीपणे राबविलेल्या उपक्रमांचा आढावा

‘हेरिटेज कोल्हापूर’ विशेष उपक्रम

कोल्हापूरच्या वैभवशाली वारशाचे जतन-संवर्धन व्हावे. तसेच, नव्या पिढीला इतिहास समजावा यासाठी ‘हेरिटेज कोल्हापूर’ हा विशेष उपक्रम गेली 3 वर्षे राबवण्यात येत आहे. महाविद्यालयीन जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, पन्हाळगड तीन दरवाजा, नगारखाना (भवानी मंडप परिसर) येथे हेरिटेज वॉक, सायबर वूमेन्स कॉलेज येथे कोल्हापुरी खाद्य, वस्तू व वास्तू प्रदर्शन उपक्रम घेण्यात आले. त्याचबरोबर टाऊन हॉल, राधानगरी-दाजीपूर परिसरातील देवराई, नगारखाना, शिलाहारांची राजधानी कसबा बीड आदी विषयांवरील चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या.

पर्यावरणपूरक उपक्रम

पक्षी वाचवा अभियान, राजाराम महाविद्यालय येथे औषधी वनस्पतीची लागवड, सीड बॉलनिर्मिती कार्यशाळा, देवराई निसर्ग संवर्धन, जलव्यवस्थापन, ‘वन्यजीव अधिवास व संरक्षण’ मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविण्यात आले.

आरोग्यविषयक जनजागृती व प्रबोधन

कोव्हिड काळात दिव्यांग, अंध, तृतीयपंथी यांच्यासह ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते यांचे विशेष लसीकरण, विविध ठिकाणी कोव्हिड प्रतिबंधक मास्कचे वितरण, स्मशानभूमी कर्मचारी,

दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन

तृतीयपंथी, एच.आय.व्ही.सह जगणार्‍या गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यासह थॅलेसेमिया, स्वमग्नता, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम याविषयीही ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले.

स्वच्छता अभियान

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तपोवन, अंबाबाई मंदिर परिसर, संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त राधानगरी अभयारण्य परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.

ऐतिहासिक विषयांवर मार्गदर्शन सत्र

इतिहास अभ्यासकांच्या सहभागातून छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यव्यवस्थापन कौशल्य, राजर्षी शाहू महाराजांचे स्त्री सबलीकरण, पर्यावरण जतनाचे कार्य, महाराष्ट्र दिनानिमित्त ‘लोककलांचा महाराष्ट्र’ , ‘वस्तुसंग्रहालय-इतिहासाचा ठेवा’ यावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले.

इतर उपक्रम

रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त रस्ते अपघात जनजागृती’, एच.आय.व्ही.सह जगणार्‍या गरजू मुलांसाठी दाजीपूर सफारी सोबत दिवाळी साहित्य प्रदान करण्यासाठी ‘एक पणती माणुसकीची’ उपक्रम, महानगरपालिका संचलित शाळांना पुस्तक भेट, रोजगार कार्डनिर्मिती शिबिर यासह कॉमर्स क्षेत्रातील करिअर संधी, भारतीय राज्यघटना व स्त्री-पुरुष समानता विषयावर मार्गदर्शन सत्र घेण्यात आली.

मान्यवरांच्या सहभागासह मार्गदर्शन सत्र

टू व्हिलर – बीएच सिक्स नवीन तंत्रज्ञान, नौदलातील संधी, ग्राहक दिन-जनजागृती, ‘अग्निसुरक्षा व उपाययोजना,’ ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा,’ ‘मराठी विज्ञान युग व मराठी साहित्य’ याविषयांसह जागतिक – नृत्य, छायाचित्र, क्रीडा, युवा, पर्यटन दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘प्रयोग’च्या व्यासपीठावरून मार्गदर्शन केले.

पाहा व्‍हिडीओ :  ‘भारत स्‍टेज -६’ तंत्रज्ञान आत्‍मसात करणे गरजेचे : प्रा.पाटणकर

 

Exit mobile version