नवी मुंबई : २४ तासात १९० मिमी पाऊस; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी | पुढारी

नवी मुंबई : २४ तासात १९० मिमी पाऊस; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा: नवी मुंबई त सलग दुस-या दिवशी मुसळधार पाऊस सुरूच आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

अधिक वाचा 

सायन पनवेल, ठाणे बेलापूर महामार्गावर तुर्भे, म्हपे, कंळबोली जंक्शनसह तुर्भे शिळफाटा मार्गावर शिळफाटा, मुंब्रा बायपास, डोंबिवली, पलावा, कटाईनाका,दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. शिळफाटा ते डोंबिवली मार्गावर क्राॅक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने सकाळी वाहतूक कोंडी झाली होती.

नवी मुंबईला सोमवारी सलग दुस-या दिवशी पावसाने जोरदार झोडपले. सर्वच महामार्गावर पाणी साचल्याने वाहने संथ गतीने मार्गक्रमण करत आहेत.

कोपरखैरणे, घणसोली,नवीन पनवेल,खांदेश्वर, खारघर,सीबीडी, नेरूळ, ऐरोली,तुर्भे एमआयडीसी,अनेक बसस्थानकात पाणी साचले.
एमआयडीसी भागात डोंगर माथ्यावरून कोसळणारे पाणी थेट सायन पनवेल महामार्गावर तुर्भेनजीक उतल्याने तुर्भे वाहतूक शाखा ते जुईनगर पर्यंत पाणी साचले.

अधिक वाचा 

उड्डाणपूलावर पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांची तारंबळ उडाली. अनेक वाहने पाणी इंडिजमध्ये गेल्याने बंद पडली.

बैठीचाळीत गुडघ्याभर पाणी साचल्याने काही घरांमध्ये पाणी शिरण्याची घटना तुर्भे सेक्टर 21 मध्ये घडली. तर विद्युत पुरवठा करणा-या बाॅक्स मध्ये पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी पुरवठा खंडीत करावा लागला होता.

अधिक वाचा 

सर्वच भुयारी मार्गात पाणी साचले. दोन ठिकाणी झाडे कोसळली. अनेक बाजारपेठांमध्ये पाणी साचले.

सीबीडी-बेलापूर येथील अर्टीज व्हिलेज येथील नाला मोठ्या प्रमाणावर वाहू लागला आहे. एका वाहनाचे नुकसान झाले. मोरबे धरणात २२५.६० मिमी पावसाची नोंद झाली असून १७०७.५० मिमी एकूण पावसाची नोंद झाली आहे.

मोरबे धरणाची पातळीत वाढ झाली असून ७८.३९ मीटरपर्यंत पोहोचली आहे. शहरात २४ तासात १९०मिमी पाऊस झाला.आतापर्यंत एकूण १६४१.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोपरखैरणेत २५६मिमी पाऊस झाला असून ऐरोलीत२२२.३० मिमी, नेरूळ १६५.५०मिमी तर बेलापूरला १५१.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

२४ तासात पाणीसाठा 1 लाख 28 हजार दशलक्ष लिटरने वाढला

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा व भातसा या प्रमुख तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडत आहे.

गेल्या २४ तासात पाणीसाठयात १ लाख २८ हजार ९३ दशलक्ष लीटर इतकी वाढ झाली आहे. १८ जुलैला तलावातील पाणीसाठा २ लाख ८७ हजार ८२ दशलक्ष लीटर इतका होता. १९ जुलैला हा पाणीसाठा ४ लाख १५ हजार १७५ दशलक्ष लिटरवर पोहचला. शहराला दररोज सर्वाधिक १ हजार ८५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठाही वाढत आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ :खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!

Back to top button