सांगली जिल्ह्यात १ ली ते ८ पर्यंतच्या शाळा बंद; पालकमंत्री जयंत पाटलांकडून घोषणा

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यात करोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा सोमवार १० जानेवारी पासून बंद करण्याचा निर्णय सांगली जिल्हा प्रशासाने घेतला असल्याची माहिती, पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. इस्लामपूरातील आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, करोनाचे झपाट्याने संक्रमण होत आहे.नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता ९ , १० वीचे वर्ग सुरू राहतील. महाविद्यालये बंद आहेत.
पुढील काही महिने करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत. करोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करून सगळ्यानी काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे वैद्यकीय सेवेवर ताण येणार नाही. कोविड रुग्णांना बेड कमी पडू नयेत यासाठी आतापासूनच दक्षता घ्यावी लावेल.
हेही वाचलत का?
- Viral Video : किती हा क्रूरपणा! पाळीव मादी कुत्र्याला भेटत होता भटका कुत्रा, मालकानं ठार मारलं!
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत अजब प्रकार; मतपेटीत सापडल्या मतदारांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या अन् पैसे…
- दिल्लीत सातार्याचा गौरव; प्रजासत्ताकदिन परेडमधील चित्ररथावर कास पठार
सांगली जिल्ह्यात गव्यानंतर आता बिबट्याचा थरार ! दुचाकीस्वारावर हल्ल्याचा बिबट्याकडून प्रयत्न https://t.co/yfxaIeRrvY
— Pudhari (@pudharionline) January 7, 2022