ऑलिम्पिक बेड अँटी सेक्स, अमेरिकन धावपटूची टीका

टोक्यो; पुढारी ऑनलाईन: जपानमधील टोकयो इथे येत्या २३ जुलैपासून ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. ८ ऑगस्टपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. दरम्यान, अँटी सेक्स बेड हा नवा वाद निर्माण झाला आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जगभरातील विविध देशांचे खेळाडू टोकयोला पोहचले आहेत. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे. क्रीडा आयोजन समितीने खेळाडूंच्या निवासासाठी खास टोकियो अ‍ॅथलीट व्हिलेज हे एक वेगळे गाव तयार केले आहे.

अधिक वाचा

टोकियो ऑलिम्पिक : भारताला सुवर्ण संधी

फिफा विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीमच

मात्र, ऑलिम्पिक व्हिलेजमधील व्यवस्था पाहून खेळाडू नाराज झाले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या दरम्यान सेक्स कसा करणार? असा प्रश्न खेळाडूंनी विचारला आहे.

काय आहे अँटी सेक्स बेड ?

या ऑलिम्पिक स्पर्धेच्या कालखंडात खेळाडू ज्या बेडवर झोपणार आहेत तो बेड अँटी सेक्स बेड म्हणून प्रसिद्ध झाला आहे. याचे कारण म्हणजे या बेडवर खेळाडू त्यांची इच्छा असली तरी रोमान्स करु शकणार नाहीत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आयोजकांनी जे उपाय केले आहेत. त्यामध्ये या बेडचा समावेश आहे.

अँटी सेक्स बेड रचनेवर अमेरिकन धावपटू नाराज

रियो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलेला अमेरिकेचा खेळाडू पॉल चेलिमो याने या बेडचा फोटो ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.


खेळाडूंना देण्यात आलेले बेड कार्डबोर्डने बनवण्यात आले आहेत. याचा हेतु खेळाडूंना जवळकी साधण्यापासून लांब ठेवणे. जे बेड तयार करण्यात आले आहेत. ते केवळ एकाच व्यक्तीचा भार झेलण्यास सक्षम आहेत, असे चेलिमो याने म्‍हटले आहे.

चेलिमो याने अनेक बेड संदर्भात अनेक ट्विट करत ऑलिम्पिक व्यवस्थापकांवर नाराजी व्यक्त केली आहे.

अधिक वाचा

शिखर धवन : टीम इंडियाचा सर्वात वयस्कर कर्णधार!

HBD इशान किशन : ‘बर्थडे’ला वनडेत प्रदार्पण करणारा ‘इशान’ दुसरा भारतीय

अँटी सेक्स बेडची रचना कशी आहे?

यावेळी खेळाडूंना देण्यात आलेले बेड कार्डबोर्डने बनवण्यात आले आहेत. ते बेड फक्त एकाच व्यक्तीचे वजन पेलू शकेल. दोन व्यक्ती या बेडवर झोपल्या तर तो बेड मोडू शकतो.

हा बेड कोणत्याही प्रकारचे झटके सहन करू शकणार नाही. त्याचबरोबर या बेडवर थोडा जरी जास्त दबाव पडला तर तो तुटेल.

कंडोम वाटण्यावरून वाद

ऑलिम्पिकमध्ये आलेल्या खेळाडूंना सुमारे दीड लाख कंडोम वाटण्यात येणार असल्याची माहिती पुढं आली आहे. मात्र खेळाडूंसाठी तयार केलेल्या खोलीचे फोटो प्रदर्शित होताच खेळाडूंनी कंडोम वाटप निरुपयोगी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

खेळाडूंसाठी तयार केलेल्या खोल्यांमध्ये असलेले बेडस हे कार्डबोर्डपासून बनवण्यात आले आहेत. त्यामुळं ते फार मजबूत नाहीत. या बेड्सनी खेळाडूंचे वजन पेललं तरी पुरे आहे, अशी प्रतिक्रियाही खेळाडूंमधून व्यक्त होत आहे.

कंडोम वाटपाची प्रथा

1988 मध्ये एड्स आणि एचआयव्हीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ऑलिम्पिकमधील खेळाडूंना कंडोम वाटप करण्याची सुरुवात झाली.

एका अभ्यासानुसार, ऑलिम्पिकमध्ये येणारे 75 टक्के खेळाडू सेक्शुअल ॲक्टीव्हीटी करतात. यापैकी जलतरण स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू यात अधिक सहभागी असतात.

कारण त्यांच्या स्पर्धा संपूर्ण ऑलिम्पिक समाप्तीच्या एका आठवडा आधी संपतात, त्यामुळे हे खेळाडू स्‍पर्धेतील  उर्वरीत वेळ  मौजमजेत घालवतात.

हे वाचलं का?

साउथ सुपरस्टार सिद्धार्थ युट्यूबवर मृत घोषीत अन्…

मुलांनी ‘बाबा आई आली’ ओरडताच रितेश देशमुख ला बसला धक्का व्हिडिओ व्हायरल

Tinder शिवाय ‘हे’ डेटिंग ॲप सुद्धा आहेत प्रसिद्ध

Back to top button