माढा सबजेलमधून गंभीर गुन्ह्यांतील चार आरोपी पळाले  | पुढारी

माढा सबजेलमधून गंभीर गुन्ह्यांतील चार आरोपी पळाले 

माढा; पुढारी वृत्तसेवा : माढा सबजेल मधून सोमवारी सकाळी आठच्या सुमारास गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी पलायन केले. माढा सबजेल मधून सिध्देश्वर शिवाजी केचे (गुन्हा- बनावट चलनी नोटा), अकबर सिध्दाप्पा पवार, (बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे), आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेकर (खुनाचा गुन्हा), तानाजी नागनाथ लोकरे (पोक्सो) अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत.

अधिक वाचा :

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपी अकबर पवार यास फीट येत होती. त्याला फीट आल्याचे आरोपींनी ड्युटीवरील अंमलदारास सांगितले. त्याला उपचारासाठी जेलच्या बाहेर काढत असताना आरोपी पोलिसांना धक्का मारून पळून गेले.

अधिक वाचा :

या आरोपींवर खून, बनावट चलनी नोटा व्यवहार, पोक्सो, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे असे  गंभीर गुन्हे नोंद आहेत.

यातील दोन  आरोपी हे कुर्डूवाडी तर दोन आरोपी हे टेंभूर्णी पोलिस ठाण्याकडील गुन्ह्यांतील आहेत. आरोपींचे पलायन झाल्याचे समजताच पोलिसांनी नाकाबंदीत करीत आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

हे ही वाचा :

Back to top button