पाटणाच्या सम्‍प्रिती यादव हिला गुगलकडून १. १० कोटींचे पॅकेज | पुढारी

पाटणाच्या सम्‍प्रिती यादव हिला गुगलकडून १. १० कोटींचे पॅकेज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारची राजधानी पाटणा येथील सम्‍प्रिती यादव हिने घेतलेल्या कष्टाचे चीज झाले आहे. तिने बिहारचेही नाव मोठं केलं आहे. पाटणामधील नेहरुनगर मध्ये राहणाऱ्या सम्‍प्रितीला गुगलने तब्‍बल १.१० कोटींचे पॅकेज दिले आहे.

सम्‍प्रिती यादवचे वडील रामाशंकर यादव एका बँकेत नोकरी करतात. आई शशी प्रभा या नियोजन आणि विकास विभागात सहाय्यक संचालक आहेत. सम्‍प्रितीने दिल्ली टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलं. तिला चार ख्‍यातनाम कंपन्यांनी नोकरीची ऑफर दिली होती. यातून तिने मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. मायक्रोसॉफ्टमध्ये तिला ४४ लाख रुपयांचे पॅकेज होते.

यादरम्यान सम्‍प्रितीला गुगलकडून ऑफर आली. गुगलने तिला १.१० कोटींचे पॅकेज दिले आहे. फेब्रुवारी २०२१ पासून ती गुगलमध्ये काम करण्यास सुरुवात करणार आहे.

मुलाखतीच्या ९ राऊंडनंतर मिळाली नोकरी

 गुगलने सम्‍प्रितीची ९ वेळा मुलाखत घेतली. या मुलाखतीत तिने गुगलकडून विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यानंतर तिला गुगलमध्‍ये नाेकरीची संधी मिळाली.

ध्येय निश्चित करून तयारी करा, यश मिळेल : सम्‍प्रिती

तुम्हाला काही मोठे करायचे असेल, तर आधी तुमचे ध्येय निश्चित करा. त्यानुसार तयारी करा, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल, असा संदेश तिने तरुणाईला दिला आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-पाटणा (IIT-P) च्या अंतिम वर्षाच्या संगणक विज्ञान पदवीधर असलेल्या दीक्षा बन्सल हिला Google मध्ये ५४.५७ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेज मिळाले हाेते. आयआयटी-बीएचयूच्या पाच विद्यार्थ्यांना यूबेर कंपनीकडून ऑफर मिळाली होती. त्यापैकी एका विद्यार्थ्याला तब्बल २.०५ कोटी रुपयांचे पॅकेज ऑफर करण्यात आले होते.

सम्‍प्रितीचा असा आहे शैक्षणिक प्रवास

सम्‍प्रितीने २०१४ मध्ये नोट्रे डेम ॲकॅडमीमधून दहावीची परीक्षा दिला हाेती. 2016 मध्ये इंटरनॅशनल स्कूल, दिल्लीतून तिने १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच JEE-Mains उत्तीर्ण केले. मे २०२१ मध्ये तिने दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक पूर्ण केले. सध्या, सम्प्रीती ४४ लाख रुपयांच्या पॅकेजसह मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी करत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button