जोहान्सबर्ग कसोटीत टीम इंडियाला मोठा धक्का; हा स्टार गोलंदाज जखमी, खेळण्यावर सस्पेन्स | पुढारी

जोहान्सबर्ग कसोटीत टीम इंडियाला मोठा धक्का; हा स्टार गोलंदाज जखमी, खेळण्यावर सस्पेन्स

पुढारी ऑनलाईन: जोहान्सबर्ग येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोघांमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना टीम इंडियाचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला. कर्णधार के. एल. राहुलने अर्धशतकी खेळी खेळली. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीम इंडिया कठीण परिस्थितीत आहे. पहिल्या डावात स्वस्तात बाद झाल्यानंतर, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हॅमस्ट्रिंगमुळे मैदानाबाहेर गेल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला.

corona guideline : सरकारी कार्यालयांत 50% कर्मचारी हजर राहणार

सिराजला चौथे षटक टाकताना ही दुखापत झाली. षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तो धावला, पण हॅमस्ट्रिंगमुळे तो पूर्ण करू शकला नाही. सिराजची दुखापत पाहून फिजिओ मैदानावर पोहोचले आणि भारतीय गोलंदाजाला मैदानाबाहेर घेऊन जाताना दिसले. सिराजच्या ओव्हरचा उरलेला चेंडू शार्दुल ठाकूरने टाकला. दिवसाचा खेळ संपल्यानंतर अश्विनने सांगितले होते की, दुखापतीचे गांभीर्य अद्याप समजू शकलेले नाही आणि वैद्यकीय कर्मचारी रात्रभर त्याच्यावर लक्ष ठेवून असतील.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

अश्विन म्हणाला की, सिराजचा इतिहास पाहता, मला आशा आहे की तो लवकर बरा होईल. त्याच्यात मैदानात उतरून सर्वोत्तम कामगिरी करण्याची ताकद आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, 202 धावांचा बचाव करताना गोलंदाजांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. शमीने एडन मार्करामला बाद करताना भारताला दिवसातील एकमेव यश मिळवून दिले. सिराजला एकही विकेट मिळाली नसली तरी त्याने तिखट मारा केला. दक्षिण आफ्रिकेने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 35 धावा केल्या होत्या.

हेही वाचा:

वेळेआधीची ‘दादागिरी’, खाड खाड आणि धाड धाड अजितदादा

pro kabaddi : बंगाल वॉरियर्सचा जयपूरवर विजय

Back to top button