CoWIN पोर्टलवर 15-18 वयोगटातील 3.5 लाखांहून अधिक मुलांची नोंदणी, उद्यापासून होणार लसीकरण | पुढारी

CoWIN पोर्टलवर 15-18 वयोगटातील 3.5 लाखांहून अधिक मुलांची नोंदणी, उद्यापासून होणार लसीकरण

पुढारी ऑनलाईन: कोविड -19 संसर्गाच्या संभाव्य धोक्यांमधून मुलांचे संरक्षण करण्यासाठी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले जात आहे. लसीकरणासाठी नोंदणी १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. रविवार सकाळपर्यंत, 15-18 वयोगटातील 3.5 लाखाहून अधिक लाभार्थ्यांनी CoWIN पोर्टलवर कोविड-19 लस मिळण्यासाठी नोंदणी केली आहे. CoWin डॅशबोर्डच्या आकडेवारीनुसार 15-18 वयोगटातील 3,57,984 लाभार्थ्यांनी सकाळी 9:30 वाजेपर्यंत पोर्टलवर नोंदणी केली होती.

नैनितालमधून धक्कादायक बातमी, नवोदय विद्यालयातील 85 मुले कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

3.5 लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी केली नोंदणी

1 जानेवारी 2022 पासून कोविड-19 विरूद्ध 15-18 वर्षे वयोगटातील लसीकरणासाठी नोंदणी सुरू झाली आहे. CoWIN हे भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे संचालित एक पोर्टल आहे. कोविड-19 लसीकरण नोंदणीसाठी हे भारत सरकारचे वेब पोर्टल आहे. CoWIN पोर्टलवरील डेटावरून असे दिसून आले आहे की आतापर्यंत 92,18,61,878 नोंदणी करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 18-44 वयोगटातील 57,37,14,969 लोक आणि 45 वर्षांवरील 34,77,88,925 लोक आहेत.

No Entry : ‘नो एंट्री’च्या सिक्वेलमध्ये सलमानसोबत 9 नायिका

3 जानेवारीपासून 15-18 वयोगटातील मुलांना लसीकरण

देशात ओमायक्रॉनच्या केसेस वेगाने वाढत आहेत आणि तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लहान मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली होती. देशातील आरोग्य विभाग सोमवार, 3 जानेवारीपासून 15-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी सज्ज आहे.

Back to top button