जालना : गुन्हेगारी टोळीच्या तुंबळ हाणामारीत एक जागीच ठार | पुढारी

जालना : गुन्हेगारी टोळीच्या तुंबळ हाणामारीत एक जागीच ठार

सुखापुरी (जि. जालना) ; पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भार्डी येथे दुचाकीच्या पैशाच्या देवाण घेवाणीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली.

भारडी येथील अचानकनगर या भागात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गटात ही घटना घडली. यामध्ये अर्जुन भुजंग पवार (वय ४५) वर्ष हा जागीच ठार झाल.

याविषयीचे सविस्तर वृत्त असे की, काल रात्रीच्या सुमारास दुचाकीच्या पैशाच्या देवाणघेवाणीतून भारडी जवळील अचानकनगर या वस्तीत हाणामारी झाली. दोन गटात धारदार शस्त्रे तसेच लाठ्या-काठ्याने आपसांत मारहाण झाली.

अधिक वाचा 

या घटनेची माहिती मिळताच अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके, पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे पोलीस अंमलदार श्रीधर खडेकर,नारायण माळी,महेश तोटे, अविनाश पगारे,अशोक कावळे,शंकर परदेशी, गणेश मुंढे,संदीप राठोड,योगेश दाभाडे यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आली असून त्यांची नावे शरद पवार आणि रामेश्वर मोरे (दोघेही रा. भार्डी) अशी आहेत.

अन्य आरोपींच्या गोदी पोलीसाकडून शोध सुरू आहे.

कुलदीप अर्जुन पवार यांच्या फिर्यादीवरून गोदी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

फरार आरोपी

राजू अर्जुन बरडे,बाळू अर्जुन बरडे,अजय भुजंग पवार उर्फ रामचंद्र रंगनाथ गांगुर्डे,दादाराव पिंगळे,शरद रोहिदास पवार,अर्जुन बरडे व इतर ४ ते ५ अनोळखो लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित दोन्ही गटांच्या विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात चोऱ्या, दरोडे, लुटमार, हाणामारी यासारखे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी दिली आहे.

अधिक वाचा 

Back to top button