मुंबई पाऊस : गोकुळ ४० तर वारणाच्या १५ हजार लिटर दुधाला फटका! | पुढारी

मुंबई पाऊस : गोकुळ ४० तर वारणाच्या १५ हजार लिटर दुधाला फटका!

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : मुंबई पाऊस : शनिवारी रात्री पासून मुंबईसह ठाणे,कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईत नेव्हवी नगर, चेंबूर, मानखुर्द, नायगाव, दादर,बोरीवली, गोरेगाव, कांदिवलीसह इतर उपनगरात दुध वितरकांना दुधाचा पुरवठा करण्यात अडचणी आल्या.

काही ठिकाणी वितरकांनी दुधाचा पुरवठा झाला पण दुध उचलले नाही. यामुळे गोकुळला ४० हजार तर वारणाला १५ हजार लीटरचा फटका बसला.

मुंबईसह उपनगरात गोकुळचे दररोज ८ लाख लिटर दुधाची विक्री होते. तर वारणाची दीड लाख ,अमोल सात लाखापर्यंत आणि त्याखालोखाल महानंदा दुधाची विक्री होते. मात्र शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी दुधाच्या गाड्या पोहचू शकल्या नाहीत.

अधिक वाचा 

पावसाचा दुधाला फटका

यामुळे दुध विक्रीवर त्याचा परिणाम झाला. अनेक दुधाच्या गाड्या परत आल्या. गोकुळचे दररोज ८ लाख लिटर दुधाची विक्री होते.

रविवारी सकाळी त्यामध्ये ४० हजार लिटर विक्रीची घट झाली असून ७ लाख ६० हजार लिटर दुधाची विक्री झाल्याची माहिती गोकुळचे व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी पुढारीशी बोलताना दिली.

वारणाचे जनरल मॅनेजर एस.एम.पाटील म्हणाले दुधाच्या गाड्या मुंबईत पाठवल्या. मात्र काही भागात वितरकांनी दुध उचलले नाही. यामुळे गाड्या परत आल्या.

वारणाचे दीड लाख दुधाची विक्री होते. आज १५ हजार लिटर दुधाचा फटका बसला आहे. हीच स्थिती गुजरातहुन मुंबईत येणा-या अमोल दुध संघाची आहे.

अधिक वाचा 

सर्वाधिक दुधाचा पुरवठा अमुलकडून होतो. त्यांना 25 टक्के नुकसान झाल्याचे दुध कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

महानंदा दुधाची ही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. मुंबईतील दादर,चेंबूर, मानखुर्द, गोवंडी,नायगाव,प्रभादेवी,गोरेगाव, कांदिवली,नेव्हवी नगरसह इतर भागात सकाळी दुध वितरकांनी दुध उचलले नाही.

ठाणे,कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल,उरणसह रायगड जिल्ह्यात ब-यापैकी दुधाचा पुरवठा झाल्याचे गोकुळ आणि वारणा मुंबई युनिटच्या व्यवस्थापकांनी सांगितले.

हे ही वाचलं का? 

Back to top button