कापडी मास्क नुसतीच फॅशन; सर्जिकल मास्कच हवा : तज्ज्ञांचे मत | पुढारी

कापडी मास्क नुसतीच फॅशन; सर्जिकल मास्कच हवा : तज्ज्ञांचे मत

पुढारी ऑनलाईन डेस्क :सध्या जगावर ओमायक्रॉन व्‍हरियंटचे संकट घोंगावत असून, त्याला रोखण्यासाठी मास्कचा वापर अत्यावाश्यक आहे.  कापडी मास्क नुसतीच फॅशन आहे, सर्जिकल मास्कच हवा असल्याचे, मत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  मात्र, जीवनशैलीचा भाग असलेल्या फॅन्सी कापडी मास्कला ओमायक्रॉन विषाणू दाद देत नसून त्यासाठी सर्जिकल मास्कच उपयुक्त आहे, असा दावा आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. लीना वेन यांनी केला आहे. सीएसएन या वेबसाइटशी बोलताना त्यांनी मास्कबाबत उपयुक्त माहिती दिली.

डॉ. लीना वेन या जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मिल्कन इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ हेल्थ पॉलिसी अँड मॅनेजमेंटच्या व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत.
वेगाने वाढत असलेल्या ओमायक्रॉन व्हायरसला रोखण्यासाठी मास्क उपयुक्त आहे. मात्र, कापडी मास्क हे केवळ दिखाव्यासाठी असून, ते विषाणू रोखू शकणार नाहीत. त्यासाठी तीन स्तरीय सर्जिकल मास्कच उपयुक्त आहेत, असा दावा वेन यांनी केला आहे.

वेन म्हणतात, कापडी मास्क हे केवळ चेहरा सुंदर दिसावा यासाठीच आहेत. ओमायक्रॉन रोखण्यासाठी त्याचा काहीच उपयोग नाही. शास्त्रज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य अधिकारी कित्येक महिन्यांपासून हे सांगत आहे. विषाणू रोखायचा असेल तर आम्हाला किमान तीनपदरी सर्जिकल मास्क घालण्याची गरज आहे. ज्याला डिस्पोजेबल मास्क म्हणूनही ओळखले जाते. हा मास्क बहुतांश सर्वच औषध दुकानांत आणि काही किराणा दुकानांमध्ये आढळतो. हा मास्क घालून तुम्ही त्यावर कापडी मास्क घालू शकता. मात्र, केवळ कापडी मास्क घालू नका, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

गर्दीच्या ठिकाणी जाताना KN95 किंवा N95 मास्क घातला पाहिजे. यांत्रिक आणि इलेक्ट्रोस्टॅटिक अशा दोन्ही प्रकारच्या अडथळ्यांप्रमाणे हे मास्क काम करतात पॉलीप्रॉपिलीन फायबर्स सारखे तंतू लहान कण आणि जंतूंना नाका-तोंडात जाण्यापासून रोखतात. त्यामुळे हे मास्क योग्यरित्या तुमच्या नाका-तोंडावर बसविले पाहिजेत.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने अनेक देशांमध्ये वैद्यकीय उपकरणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी सामान्य लोकांना N95चे मास्क वापरू नयेत, असे सल्ले दिले. अजूनही पुरेशा प्रमाणात हे मास्क उपलब्ध नाहीत. अलिकडेच यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने फेस मास्क निवडणे, योग्यरित्या परिधान करणे, साफ करणे आणि जवळ बाळगण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात त्यांनी नागरिकांनी N95 चे मास्क घालण्याची शिफारस केली आहे. तसेच धुण्यायोग्य, श्वास घेण्यायोग्य फॅब्रिकचे दोन किंवा अधिक स्तर असलेले मास्क निवडा, असे म्हटले आहे.

जर्मनी आणि ऑस्ट्रियासह इतर देशांनी काही विशिष्ट प्रकारचा मास्क मास्क वापरण्याची सूचना केली आहे. त्यात सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणारा किमान वैद्यकीय दर्जाचा सर्जिकल मास्क असावा असे सांगत असताना त्यांना जुने निकष बदलावे लागले.
यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थने मंजूर केलेले N95 मास्क हवेतील ९५ टक्के कण फिल्टर करते. तर सर्जिकल किंवा डिस्पोजल मास्क N95 रेस्पिरेटर्सपेक्षा 5 ते 10 टक्के कमी प्रभाव आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button