तटरक्षक दलात ३२२ पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया ४ जानेवारीपासून | पुढारी

तटरक्षक दलात ३२२ पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया ४ जानेवारीपासून

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक दलाने नाविक जीडीसह अनेक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण ३२२ पदांची भरती निघाली आहे. यातील २६० पदे नाविक जनरल ड्युटी, ३५ पदे सेलर डीबी आणि २७ पदे मेकॅनिकलची आहेत. मात्र, त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.

अधिसूचनेनुसार, या ३२२ पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ४ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल आणि १४ जानेवारी २०२२ रोजी सांयकाळी पाच वाजेपर्यंत आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिसूचना पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता आणि अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज करू शकता.

पात्रता :

सेलर जनरल ड्युटी पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किंवा संस्थेतून इंटरमिजिएट उत्तीर्ण असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे इंटरमिजिएटमध्ये भौतिकशास्त्र किंवा गणितदेखील असणे आवश्यक आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार नाविक पदासाठी फॉर्म देखील भरू शकतात. मेकॅनिकल पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दहावीसह डिप्लोमा पास असणे अनिवार्य आहे. या सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २२ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

या भरती प्रक्रियेद्वारे, ज्या उमेदवारांची नाविक (GD) आणि नाविक (DB) पदांवर निवड केली जाईल त्यांना वेतन स्तर-3 अंतर्गत मूळ वेतन म्हणून 21,700 रुपये मिळेल. तर, मेकॅनिकलच्या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर-5 अंतर्गत मूळ वेतन म्हणून रु.29,200 मिळतील आणि त्याव्यतिरिक्त त्यांना यांत्रिक वेतन म्हणून रु.6,200 स्वतंत्रपणे मिळतील. या सर्व पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार अनेक भत्त्यांचा लाभही मिळणार आहे.

हेही वाचलं का?

Back to top button