भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे ईडीच्या कारवाईवरून सुचक वक्तव्य | पुढारी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे ईडीच्या कारवाईवरून सुचक वक्तव्य

नाशिक ; पुढारी वृत्तसेवा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर भाष्य केले आहे. ईडी स्वतंत्र संस्था आहे. त्याबाबत काही बोलणार नाही. एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख यांनी काही केले नसेल तर चौकशीला घाबरण्याचे कारण नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले आहे.

पाटील पुढे म्हणाले की, ठाकरे हे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, तर ते इतरांबरोबर गेले आहेत.

अधिक वाचा : 

शिवसेनेच्या भुमिकेबद्दल नाराज

एकत्र निवडणूक लढवायची आणि दुसऱ्यांसोबत गेल्याचे शल्य आम्हाला असल्याची भावना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक येथे व्यक्त केली.

नाशिक दौऱ्यावर त्यांचे शुक्रवारी आगमन झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले,  भाजप राष्ट्रवादीच्या विरोधात नाही तर आम्ही अन्यायाच्या विरोधात आहोत.

अधिक वाचा : 

आम्ही सरकार विरोधात

आम्ही सरकार विरोधात आहोत. त्याचबरोबर आमचा लढा ओबीसी प्रश्न आणि साखर कारखाने घोटाळे याविरोधात आहे.

दरम्यान पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा केल्या जात आहेत. पंरतु पंकजा मुंडे नाराज नाहीत तर त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत.
राज ठाकरे ही नाशिक दौऱ्यावर असल्याने चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावरही भाष्य केले.

अधिक वाचा : 

राज ठाकरे एकहाती राज्यात सत्ता आणू शकत नाहीत. ते एकटे राज्यातील जनतेच भले करू शकत नाहीत. त्यांनी व्यापाक राजकारणामध्ये यावे. तसेच मनसे परप्रांतीयांच्या बद्दलची भूमिका बदलत नाही तो पर्यंत आम्ही एकत्र येणार नाही. शिवसेना आमच्या सोबत नाही पण आमचे वैरही नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात तत्व अस्मिता गुंडाळून ठेवली गेली आहे. यामुळे जाता जाता विश्वास घात होतो. तर सत्ता ही फेविकॉकसारखी आहे त्यामुळे कोणालाही सोडवत नाही.

कोणालातरी आईस्क्रीम मिळावे तशी सत्ता या महाविकास आघाडीला मिळाली असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

हे ही वाचा : 

Back to top button