दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहली याने घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय | पुढारी

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहली याने घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : २६ डिसेंबरपासून ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी वनडेचा माजी कर्णधार विराट कोहली याने वन डे मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला यामुळे मोठा धक्का बसला आहे.

कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे. रोहित शर्मा काही दिवसांपूर्वी कसोटी संघाचा उपकर्णधार आणि वन डे कर्णधार झाला आहे. दुखापतीमुळे तो या मालिकेत खेळणार नाही, असे बीसीसीआयने आधीच सांगितले आहे.

अशात विराट कोहली दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाही. काहीच दिवसांपूर्वी विराटकडून वनडेचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. रोहित शर्मा नवा कर्णधार झाला होता. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला असून विश्रांती द्यावी अशी विनंती बीसीसीआयकडे केली आहे.

दक्षिण आफ्रिका दौरा, विराट कोहली नाराज

टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत आणि पहिल्या कसोटीसाठी विराटने विश्रांती घेतली होती. विराट कर्णधारपद काढून घेतल्याने नाराज आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.

रोहित शर्माच्या दुखापतीमुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितची दुखापत गंभीर आहे. ही दुखापत बरी झाली नाही तर तो वनडे मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. वन-डे मालिकेतील पहिली लढत १९, दुसरी २१ जानेवारी आणि तिसरी २३ जानेवारी रोजी होणार आहे. विराटकडून वन-डे संघाचे कर्णधारपद काढून घेतल्यामुळे तो नाराज आहे. वन डे मालिकेसाठी उपकर्णधार पदाची निवड झाली नाही.

जडेजाही घेणार निवृत्ती 

क्रिकेटपटू रवींद्र जडेजा लवकरच कसोटी क्रिकेटबाबत महत्त्‍वपूर्ण निर्णय घेणार आहे. न्‍यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्‍यात त्‍याला दुखापत झाली. त्‍यामुळे आता तो दक्षिण आफ्रिका दौर्‍यातूनही बाहेर पडला आहे. त्‍याला झालेली दुखापत गंभीर आहे.त्‍यामुळे तो लवकरच तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्‍याची घोषणा करेल, असे ‘स्पोर्ट्स कॅफे’ने म्‍हटलं आहे.

 

हेही वाचा: 

Back to top button